बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आज ५६वा वाढदिवस आहे. ‘धडकन’, ‘हेरा फेरी’, ‘वेलकम’, ‘खिलाडी’ असे सुपरहिट चित्रपट त्याने बॉलिवूडला दिले. अक्षयने अनेक बायोपिकमध्येही काम केलं आहे. ‘टॉयलेट एक प्रेमकथा’, ‘रुस्तम’, ‘एअरलिफ्ट’, ‘सम्राट पृथ्वीराज’ या सिनेमांत त्याने विविधांगी भूमिका साकारल्या. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये अक्षय कुमारचं नाव घेतलं जातं. त्याचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे.
अक्षय कुमारने आज वाढदिवसानिमित्त उज्जैन येथील बाबा महाकाल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्याने भगव्या रंगाचे कपडे परिधान केले होते. अक्षय कुमार कुटुंबीयांसह भस्म आरतीलाही हजर होता. या मंदिरातील नंदी हॉलमधून त्याने महाकालचे दर्शन घेतलं. बाबा महाकाल मंदिरातील अक्षय कुमारचा व्हिडिओ विरल भय्यानी या पापाराझी पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. अक्षय कुमारबरोबरच भारतीय क्रिकेटर शिखर धवनही बाबा महाकालच्या दर्शनासाठी गेल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
"महाराजांची वाघनखं आणताय त्याबद्दल अभिनंदन, जमलं तर...", नाना पाटेकरांचा भाजपा मंत्र्याला सल्ला
शिखर धवन आणि अक्षय कुमार महाकालच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. अक्षयबरोबर त्याचा मुलगा आरव, भाची सिमर आणि बहीण अलका हिरानंदानीही यावेळी उपस्थित होते. अक्षयचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.
इंडिया, हिंदुस्थान की भारत! रितेश देशमुखने घेतला पोल; चाहत्यांचा कौल कोणाला?
दरम्यान, नुकताच अक्षयचा ‘ओएमजी २’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता अक्षय ‘मिशन राणीगंज’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचं पोस्टर शेअर करत अक्षयने ही माहिती चाहत्यांनी दिली.