Join us

अक्षय कुमारने म्हणतो, 500 किलोमीटरच्या अंतरावर टॉयलेट असावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2017 14:57 IST

ट्राव्सफॉर्म महाराष्ट्र या कार्यक्रमादरम्यान अभिनेता अक्षय कुमार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले होते. यावेळी दोघांनी मिळून विद्यार्थ्यांशी ...

ट्राव्सफॉर्म महाराष्ट्र या कार्यक्रमादरम्यान अभिनेता अक्षय कुमार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले होते. यावेळी दोघांनी मिळून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अक्षयने महाराष्ट्रात 500 किलोमीटरच्या अंतरावर टॉयलेट्स बनवण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला. यामुळे स्वच्छतेत वाढ होईल तसेच यासंदर्भात एक अॅप तयार करण्यात यावे ज्याच्या माध्यमातून लोकांना टॉयलेट्सच्या बाबती माहिती द्यावी यामुळे त्यांने जवळचे टॉयलेट शोधणे सोप्पे जाईल. गावातील महिलांची टॉयलेट्सच्या बाबतीत स्थिती फारच वाईट असते. तसेच अक्षय़ म्हणाला महाराष्ट्र सरकारने जुन्या एसटीडी आणि आयएसडी टेलिफोन बूथप्रमाणे ठिकठिकाणी टॉयलेट्स बनवावे. ज्याचे लोकशेनची माहिती एक अॅपवर उपलब्ध असेल.आपल्या देशात आजही लोक उघड्यावर, शेतातमध्ये टॉयलेट्सला बसतात. परदेशात आपण पाहतो की एक- दोन किलोमीटरच्या अतंरावर टॉयलेट्स उपलब्ध असतात. त्याच प्रमाणे आपण ही उभारावीत याबाबत राज्य सरकारने गंभीरपणे विचार करावा असे ही तो म्हणाला. अक्षयच्या या सल्ल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले आहे. याबाबत सरकार लवकरच योग्य ती उपाययोजना करले असे आश्वासन त्यांनी दिले आहे. यावेळी अक्षयने त्याचा आगामी चित्रपट टॉयलेट एक प्रेमकथा यातील एक डायलॉग म्हटला अगर बिवी पास चाहिए, तो घर में संडास चाहिए” असे म्हणते उपस्थितांची दाद मिळवली.  अक्षय कुमाराने एक अभिनेता असण्याबरोबर नेहमीच आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. शहिद जवानांच्या कुटुबांची आर्थिक मदत केली आहे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.