Time hai apni #SochAurShauch dono badalne ka. Dekhiye, sochiye aur apne vichar bataiye
अक्षय कुमार म्हणतो; महिलांना ‘सॉरी’ म्हणा अन् कामाला लागा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 15:32 IST
अक्षय कुमारचा ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. एका वेगळ्या पण महत्त्वपूर्ण मुद्याला वाहिलेला हा ...
अक्षय कुमार म्हणतो; महिलांना ‘सॉरी’ म्हणा अन् कामाला लागा...
अक्षय कुमारचा ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. एका वेगळ्या पण महत्त्वपूर्ण मुद्याला वाहिलेला हा चित्रपट स्वच्छता आणि यासंदर्भात महिलांची दयनीय अवस्था यावर प्रकाश टाकतो. या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून अक्षयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याचा हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. सुमारे सहा मिनिटांचा हा व्हिडिओ म्हणजे केवळ अक्षयचा प्रमोशन फंडा असल्याचे काही लोक मानतील. पण अक्षयला अशा लोकांची पर्वा नाही. कारण महिलांना खुल्या जागेवर शौच करण्यास भाग पाडणाºया या देशातील एका गंभीर समस्येकडे अक्षय लक्ष वेधू पाहतो आहे. आजही देशातील ५४ टक्के लोकसंख्या उघड्यावर शौचास जाते. लोकांकडे व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्टफोन आणि इंटरनेट आहे. पण शौचास मात्र ते उघड्यावर जातात. या देशातील अनेक लोक परंपरा आणि आत्मसन्मानाच्या बाता मारतात. पण त्यांच्या घरातील महिला उघड्यावर शौचास जातात, तेव्हा त्यांच्या सन्मानाला कुठलीही ठेच लागत नाही. हे लोक घरात महिलांना पडद्यात ठेवतात. पण याच महिलांना सकाळी उजाळण्याआधी शेतात शौचास जावे लागते. अर्थात यामुळे या महिलांच्या नवºयांना लाजीरवाणे वाटत नाही. शौच रोखली जात असल्याने अनेक महिलांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. हे आजार त्यांच्या मुलांमध्येही येतात, असे अक्षय या व्हिडिओत सांगतो आहे. शिवाय व्हिडिओच्या शेवटी लोकांना संदेशही देतो आहे. आपल्या घरातील महिलांची माफी मागा आणि घरात टॉयलेट बनवा, असे तो सांगतो. आता अक्षयचा हा सल्ला किती लोक मनावर घेतात ते बघूच!