Join us  

अक्षय कुमार पुन्हा करणार ‘हॉरर कॉमेडी’!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 8:24 PM

आपल्या २७ वर्षांच्या करिअरमध्ये अक्षय कुमारने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्यात. स्वत:ला एकाच चौकटीत बांधून न ठेवता   अनेक त-हेच्या चित्रपटांची निवड केली.

आपल्या २७ वर्षांच्या करिअरमध्ये अक्षय कुमारने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्यात. स्वत:ला एकाच चौकटीत बांधून न ठेवता   अनेक त-हेच्या चित्रपटांची निवड केली. अगदी अ‍ॅक्शन, कॉमेडी पासून हॉरर कॉमेडीपर्यंत अशा अनेक जॉनरचे चित्रपट त्याने केलेत. मध्यंतरी अक्षय सोशल मुद्यांवरच्या अनेक चित्रपटात दिसला. यानंतर आता तो पुन्हा एकदा हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. होय, २०११ मध्ये रिलीज झालेल्या ‘कंचना- मुनी2’ या तामिळ हॉरर कॉमेडीच्या हिंदी रिमेकमध्ये अक्की झळकणार आहे.

११ वर्षांपूर्वी असाच एक ‘भूल भूलय्या’ हा हॉरर कॉमेडी सिनेमा अक्षयने केला होता. गतवर्षी आलेला त्याचा ‘गोलमाल अगेन’ही याच पठडीतला होता. हॉरर कॉमेडी चित्रपटांचा एक खास प्रेक्षकवर्ग आहे आणि अक्षय हे जाणून आहे. त्यामुळे पुन्हा एकदा असाच चित्रपट करण्याचा त्याचा इरादा पक्का आहे. ‘कंचना’च्या मेकर्ससोबत अक्षयची ब-याच दिवसांपासून चर्चा सुरू असल्याचे  कळतेय. सूत्रांचे मानाल तर अक्षयने या चित्रपटाला कधीचाच होकार दिला आहे. पण डेट्स नसल्याने हा प्रोजेक्ट रखडला होता. मात्र आता अक्षयने डेट्सही फायनल्या केल्या आहेत. करिना कपूरसोबतचा ‘गुड न्यूज’ हातावेगळा करताच अक्षय या चित्रपटाचे शूटींग सुरू करेल.

 

 

 

टॅग्स :अक्षय कुमार