Join us

​अक्षय कुमार-रजनीकांतचा मास्टर प्लॉन तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 21:37 IST

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार व दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत याच्या प्रमुख भूमिका असलेला ‘2.0’ हा चित्रपट दिवाळीत रिलीज केला जाणार ...

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार व दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत याच्या प्रमुख भूमिका असलेला ‘2.0’ हा चित्रपट दिवाळीत रिलीज केला जाणार आहे. मात्र, हा चित्रपट आतापासूनच चर्चेत स्थान मिळवितो आहे. आतापर्यंत केवळ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाचे टीझर लाँचसाठी जोरदार तयारी चालविली असून यासाठी एक मास्टर प्लॉन तयार करण्यात आल्याची माहिती मिळतेय. रजनीकांत व अक्षय कुमार यांच्या भूमिका असणारा ‘रोबोट २’ म्हणजेच ‘2.0’ या चित्रपटाचा टीझर १४ एप्रिलला रिलीज केला जाणार असल्याची माहिती मिळतेय. विशेष म्हणजे याच दरम्यान एस.एस. राजमौली यांचा बाहुबली २ हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. बाहुबलीची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे अशावेळी या चित्रपटाच्या रिलीजसमोर ‘2.0’ मागे पडू नये असे निर्मात्यांना वाटू लागले आहे. यासाठीच या चित्रपटाच्या दोन आठवड्याआधी 2.0 चा टीझर लाँच केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2.0चा टीझर नेत्रदीपक सोहळा असणार आहे, विशेष म्हणजे हा टीझर तामीळ नववर्षावर रिलीज करण्यात येणार आहे. यासाठी चेन्नईमधील एक स्टेडिअम बुक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र यात काय केले जाणार आहे हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. काहीतरी भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे सांगण्यात येत आहे. सध्या या चित्रपटाच्या शेवटच्या भागाचे शूटिंग शिल्लक असून अक्षय कुमार आणि रजनीकांत ३० जानेवारीपासून शूटिंगला सुरुवात करतील असेही सांगण्यात येत आहे. तर मार्च पर्यंत हा चित्रपटचे चित्रीकरण पूर्ण झालेले असेल. यानंतर पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू करण्यात येणार आहे. हा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटात आतापर्यंतचे सर्वांत चांगले स्पेशल इफेक्ट दाखविले जाणार आहेत. 2.0 हा आतापर्यंतचा सर्वांत महागडा चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटाचे बजेट ३५० कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाची लढत बाहुबलीशी असल्याचे सांगण्यात येत आहे. ही लढत बॉक्स आॅफिससोबतच तंत्रज्ञानाची असल्याने निर्माते कोणतिही रिस्क घेण्यास तयार नाही. यामुळे टीझर लाँच करण्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे.