Join us  

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाच्या लग्नातील हा फोटो झालाय व्हायरल, ट्विंकल दिसतेय खूपच छान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 7:13 PM

ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार हे दोघे या फोटोत खूपच छान दिसत आहेत.

ठळक मुद्देट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार हे दोघे या फोटोत खूपच छान दिसत असून लाल रंगाच्या साडीत तिचे सौंदर्य आणखीन खुलून आले आहे.

ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांना बॉलिवूडमधील क्यूट कपलपैकी एक मानले जाते. अक्षय कुमारचे टीनावर म्हणजेच ट्विंकलवर भरपूर प्रेम आहे. त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला त्या दोघांचे अनेक फोटो पाहायला मिळतात. नुकताच त्यांचा लग्नाचा फोटो व्हायरल झाला असून हा फोटो त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार हे दोघे या फोटोत खूपच छान दिसत असून लाल रंगाच्या साडीत तिचे सौंदर्य आणखीन खुलून आले आहे. तुमची जोडी तेव्हा देखील क्यूट दिसत होती आणि आजही तुमची जोडी तितकीच क्यूट दिसते असे त्यांचे चाहते त्यांना सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.

ट्विंकल आणि अक्षय यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. अक्षय आणि ट्विंकल यांची पहिली भेट फिल्मफेअर मासिकाच्या कव्हरपेजच्या फोटो शूटिंगसाठी झाली होती. या फोटोशूटनंतर अक्षयला ट्विंकल आवडायला लागली. त्यानंतर त्या दोघांनी इंटरनॅशनल खिलाडी या चित्रपटात काम केले. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांचे अफेअर सुरू झाले आणि काहीच महिन्यात अक्षयने ट्विंकलला लग्नासाठी प्रपोज केले. पण लग्न करण्याआधी ट्विंकलने त्याच्यापुढे एक अट ठेवली होती. 

ट्विंकलने त्याला सांगितले होते की, माझा लवकरच प्रदर्शित होणारा मेला हा चित्रपट फ्लॉप ठरला तरच मी तुझ्याशी लग्न करेन... हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला आणि त्या दोघांनी ७ जानेवारी २००१ मध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. अक्षय आणि ट्विंकलचे लग्न अबू जानी आणि संदीप खोसला या प्रसिद्ध डिझायनरच्या घरी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत झाले होते.

 

टॅग्स :ट्विंकल खन्नाअक्षय कुमार