अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट एक रिश्ताः दि बॉन्ड ऑफ लव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 15:57 IST
होम ऑफ ब्लॉकबस्टर्स झी सिनेमा तुमच्यासाठी घेऊन येत आहे पॉवरपॅक भावनिक नाट्य, ‘एक रिश्ताः दि बॉन्ड ऑफ लव्ह’. हा ...
अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट एक रिश्ताः दि बॉन्ड ऑफ लव्ह
होम ऑफ ब्लॉकबस्टर्स झी सिनेमा तुमच्यासाठी घेऊन येत आहे पॉवरपॅक भावनिक नाट्य, ‘एक रिश्ताः दि बॉन्ड ऑफ लव्ह’. हा चित्रपट शनिवार, ३ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता झी सिनेमा वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे. अगदी हृदयाला स्पर्श करतील असे परफॉर्मन्सेस आणि भारतातील अॅक्टिंग पॉवर हाऊसेस - ‘बिग बी’ आणि ‘खिलाडी ऑफ बॉलिवूड’ यांच्यासह ह्या चित्रपटातून घरातील सदस्यांमधील विभिन्न नाती आणि कौटुंबिक बंध कसे त्यांना एकमेकांसोबत राखतात हे पाहायला मिळेल. दोन सुपरस्टार्स अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार हे प्रथमच ’एक रिश्ताः दि बॉन्ड ऑफ लव्ह’ ह्या चित्रपटातून एकत्र काम करताना दिसून आले.सुनील दर्शन दिग्दर्शित ह्या कौटुंबिक नाट्यामध्ये एक दिल है आणि हम खुश हुए अशी ९० च्या दशकातील संगीत दिग्दर्शक जोडी नदीम-श्रवण यांची सुमधूर गीते आहेत. करिष्मा कपूर, जूही चावला आणि मोहनिश बहल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका ह्या चित्रपटात असून अख्ख्या परिवाराचे मनोरंजन करेल असा हा भावनिक चढउतार असलेला चित्रपट आहे.‘एक रिश्ताः दि बॉन्ड ऑफ लव्ह’ ही कथा आहे अजय (अक्षय कुमार) ची, जो विदेशात शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परततो. त्याचे वडिल विजय कपूर (अमिताभ बच्चन) हे एक यशस्वी व्यावसायिक असून त्यांची अशी अपेक्षा आहे की अजयने त्यांचा व्यवसाय सांभाळावा. पण अजय आपला मार्ग निवडतो. राजेश (मोहनिश बहल) ह्या अनाथ मुलाला नोकरीची गरज असून तो ह्या परिवारात शिरकाव करतो आणि विजयवर आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो. अर्थातच त्याच्या छुप्या कटकारस्थानांची माहिती नसल्यामुळे आणि अजयच्या वागण्यामुळे व्यथित होऊन विजय राजेशला पॉवर ऑफ अॅटॉर्नी देतात आणि आपली मुलगी प्रीती (जूही चावला) चे लग्न त्याच्याशी लावून देतात. ह्या सगळ्यामुळे राजेशच्या हातात सगळा कारभार येतो आणि मग अख्ख्या परिवाराला मोठ्या द्वंद्वाला सामोरे जावे लागते.