Join us  

अक्षय कुमारची ही हिरोईन आधी बनली आई, आता करणार लग्न!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 8:00 AM

अक्षय कुमारच्या या हिरोईनने गत 23 सप्टेंबरला एका गोंडस मुलाला जन्म दिला.

ठळक मुद्देएमी जॅक्सन मागील वर्षी रजनीकांतच्या ‘2.0’ मध्ये दिसली होती.  एमीने ‘एक दिवाना था’या सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरूवात केली होती.

अक्षय कुमारच्या ‘सिंग इज ब्लिंग’ या चित्रपटाची अभिनेत्री एमी जॅक्सन हिने गत 23 सप्टेंबरला एका गोंडस मुलाला जन्म दिला. आता मुलाला जन्म दिल्यानंतर एमी लग्न करणार आहे. लग्नापूर्वी एमी आई झाली. आता आई बनल्यानंतर ती जॉर्जची पत्नी होणार आहे. होय, पुढील वर्षी म्हणजे 2020 मध्ये जॉर्ज पानायिटूसोबत लग्न करण्याची तिची योजना आहे. ग्रीसमध्ये हे लग्न होणार असल्याचे कळतेय. यासाठी एमी व जॉर्ज यांनी लोकेशनही फायनल केल्याचे समजतेय. एका बीचसाईडला हा ग्रॅण्ड विवाहसोहळा होणार आहे. तोपर्यंत एमीचे बाळ काही महिन्यांचे होईल.

काल परवाच एमीने आपल्या बाळाचा फोटो शेअर केला होता.   एंड्रिआज असे या बाळाचे नामकरण करण्यात आले आहे. या फोटोत एमी बाळाला स्तनपान करताना दिसली होती.यानंतर दोन दिवसांच्या आपल्या बाळासोबत सैर करतानाचे काही फोटोही तिने शेअर केले होते.

जॉर्ज व एमी 2015 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत.  2018 मध्ये दोघांनी आपले रिलेशन जगजाहिर केले होते. यानंतर दोघांनी साखरपुडा केला होता. तेव्हाच एमी दोन महिन्यांची प्रेग्नंट होती. 

जॉर्जचा ‘क्वीन सिटी’ नामक एक अलिशान नाईटक्लब आहे. एमीला डेट करण्यापूर्वी जॉर्ज पॉप गायिका शेरिल कोलला डेट करत होता. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले आणि जॉर्जला एमी मिळाली.  एमी जॅक्सन मागील वर्षी रजनीकांतच्या ‘2.0’ मध्ये दिसली होती.  एमीने ‘एक दिवाना था’या सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरूवात केली होती.

टॅग्स :एमी जॅक्सनअक्षय कुमार