Join us

अजयने शेअर केले शिवाय कॉमिक्सचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 22:50 IST

अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेला ‘शिवाय’ या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. अजयने ‘शिवाय’चे प्रमोशन करण्यासाठी कॉमिक्स बुक ...

अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेला ‘शिवाय’ या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. अजयने ‘शिवाय’चे प्रमोशन करण्यासाठी कॉमिक्स बुक लाँच करण्यात येणार असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. अजयने या कॉमिक्स बुकचे काही चित्रे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या कॉमिक्समधील नायक हुबेहुब शिवाय मधील अजय देवगनसारखाच दिसतो. अजयने काही दिवसांपूर्वी शिवायचे कॉमिक्स बुक लॉच करणार असल्याचे जाहीर केले होते. 23 आॅक्टोबरला हे बुक लाँच करण्यात येणार आहे. मात्र कॉमिक्स बुकची कथा ही शिवायच्या कथेपेक्षा वेगळी असेल असेही तो म्हणाला होता. शिवायच्या कॉमिक्सची रुपरेषा बेंगलुरूच्या एका कंपनीने साकारली असून यातून ‘हवामान विज्ञाना’ची ओळख होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अजयने या कॉमिक्स बुकची चित्रे शेअर करताना काही कमेंट्स केल्या आहेत. सोबतच काही पाने देखील एकापाठोपाठ एक ट्विट करीत शेअर केली आहे. या कॉमिक्समध्ये शिवाय नावाचा गिर्यारोहकाच्या साहस कथा असून तो आपल्या शक्ती व कौशल्य व दक्षतेने आपदेवर कसा विजय मिळवितो हे यातून पहायला मिळणार आहे. शेअर केलेल्या या कॉमिक्सच्या फोटोमध्ये शिवायसोबत त्याचा जोडीदार विक्रांतचा उल्लेख करण्यात आला आहे. विक्रांत कोण आहे याचे गुढ कॉमिक्स आल्यावरच कळेल. शिवायचा हा जोडीदार चित्रपटतही दिसेल का? असा सहज प्रश्नही निर्माण होतो. मात्र शिवायच्या या कॉमिक्सचा चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर किती फायदा होणार हे तर येणारा काळच सांगेल. शिवाय सोबतच करण जोहरचा एै दिल है मुश्किल हा चित्रपद देखील प्रदर्शित होत आहे. यामुळे दिवाळीला बॉक्स आॅफिसवर चांगलीच आतशबाजी होणार असल्याचे दिसते. }}}} ">http://}}}} ">http://