Join us  

अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार 2’ बंद! कारण वाचून बसेल धक्का!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 12:45 PM

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने काही दिवसांपूर्वी ‘बॅटल ऑफ सारागढी’वर आधारित चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे नाव होते, ‘सन ऑफ सरदार 2’.

ठळक मुद्देएकाच विषयावर दोन चित्रपट बनण्यात काहीही अर्थ नाही, कदाचित हा विचार करूनही अजय व त्याच्या चित्रपटाने ‘सन ऑफ सरदार 2’ बनवण्याचा इरादा सोडला असू शकतो.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने काही दिवसांपूर्वी ‘बॅटल ऑफ सारागढी’वर आधारित चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे नाव होते, ‘सन ऑफ सरदार 2’. सारागढीचे युद्ध भारतीय इतिहासातील सर्वाधिक  यादगार युद्धांपैकी एक आहे. या युद्धात केवळ २१ शिख सरदारांनी १० हजार अफगाणी सैन्याला मात दिली होती. याच युद्धावरचा ‘सन ऑफ सरदार 2’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. पण ताजी बातमी खरी मानाल तर, अजय देवगणने हा चित्रपट बनवण्याची विचार सोडून दिलाय.

होय, अलीकडे ‘टोटल धमाल’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये खुद्द अजयने याबाबतचा खुलासा केला. आमची टीम ब-याच दिवसांपासून ‘सन ऑफ सरदार 2’वर काम करत होती. पण चित्रपटाची कल्पना जमून आली नाही. त्यामुळे आम्ही या चित्रपटाचा इरादा सोडून दिला. त्याजागी आम्ही ‘तानाजी- द अनसंग वॉरियर’ बनवण्याचा निर्णय घेतला, असे अजयने सांगितले.अजयने ‘सन ऑफ सरदार 2’ची घोषणा केली होती, तेव्हा हा चित्रपट भव्यदिव्य रूपात बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. साहजिकच यासाठी मोठ्या तयारीची गरज होती. चित्रपटात खूप मोठ्या प्रमाणात व्हीएफएक्स तंत्राची गरज भासली असती. हे बघता कदाचित पोस्ट प्रॉडक्शनच्या कामावरचं घोडे अडले आणि अजयने हा चित्रपट बनवण्याचा विचार सोडून दिला, असे वाटतेय. याशिवाय या चित्रपटाची कल्पना रद्द करण्यामागे आणखी एक कारण असू शकते. ते म्हणजे, अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘केसरी’. होय, अक्षयचा ‘केसरी’ हा सिनेमाही सारागढी युद्धावर आधारित आहे. आजच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. एकाच विषयावर दोन चित्रपट बनण्यात काहीही अर्थ नाही, कदाचित हा विचार करूनही अजय व त्याच्या चित्रपटाने ‘सन ऑफ सरदार 2’ बनवण्याचा इरादा सोडला असू शकतो.

टॅग्स :अजय देवगणकेसरी