Join us  

कोरोना व्हायरसच्या थैमानमध्ये अजय देवगणच्या फॅन्ससाठी आली खुशखबर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 4:17 PM

बॉलिवूडच्या कलाकरांनी कोरोनापासून वाचण्यासाठी स्वत:ला आसोलेटेड केले आहे.

सध्या सगळीकडे कोरोना व्हायरसे आपले थैमान घातले आहे. बॉलिवूडच्या कलाकरांनी कोरोनापासून वाचण्यासाठी स्वत:ला आसोलेटेड केले आहे. मालिका असो वा सिनेमा सगळ्यांचं शूटिंग ठप्प झाले आहे. याच दरम्यान अजय देवगणच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार अजय देवगण लवकरच प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहे. त्याने एक मोठा सिनेमा साईन केला आहे. 

गेल्यावर्षी अजय देवगण इंद्र कुमारच्या टोटल धमाल या मल्टीस्टारर कॉमेडी सिनेमात दिसला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. त्यानंतर पुन्हा एकदा इंद्र कुमार आणि अजय देवगण प्रेक्षकांना हसवायला तयार झाले आहेत. अजय इंद्र कुमारच्या 'थँक गॉड' या सिनेमात दिसणार आहे.  

यात अजयसोबत अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार आहेत. या सिनेमाची शूटिंग 10 एप्रिल पासून सुरु होणार होती मात्र कोरोना व्हायरसमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा सिनेमा 2021च्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. यामुळे काही दिवसांपूर्वीच रोहित शेट्टीने त्याच्या सूर्यवंशी सिनेमाची रिलीज डेट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. 

टॅग्स :अजय देवगण