Join us  

अजय देवगणने सांगितले, का फ्लॉप झालेत तिन्ही ‘खान’?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 3:55 PM

गतवर्षी तिन्ही खानांचे हे बिग बजेट चित्रपट असे धडाधड आपटलेले पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. पण अजय देवगणला मात्र याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही.

ठळक मुद्दे०१८ मध्ये सलमान, आमिर, शाहरूख सगळ्यांचे चित्रपट फ्लॉप झालेत, असे का? असा प्रश्न अजयला केला गेला. यावर अजयने अगदी सविस्तर उत्तर दिले.

गतवर्षी प्रदर्शित झालेले आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान या तिन्ही खानांचे चित्रपट धडाधड आपटलेत. सर्वप्रथम सलमान खान ‘रेस 3’ फ्लॉप झाला. यानंतर आमिर खानचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ आला अन् दणकून आपटला. यापाठोपाठ आलेल्या शाहरूखच्या ‘झिरो’ची तर सर्वात वाईट गत झाली. तिन्ही खानांचे हे बिग बजेट चित्रपट असे धडाधड आपटलेले पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. पण अजय देवगणला मात्र याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. एका ताज्या मुलाखतीत, अजयने हे चित्रपट फ्लॉप होण्यामागचे कारण सांगितले.

२०१८ मध्ये सलमान, आमिर, शाहरूख सगळ्यांचे चित्रपट फ्लॉप झालेत, असे का? असा प्रश्न अजयला केला गेला. यावर अजयने अगदी सविस्तर उत्तर दिले. ‘ठग्स’, ‘रेस 3’, ‘झिरो’ यापैकी एकाही चित्रपटाला कथा नव्हती. चित्रपट केवळ उत्तम कथेमुळे यशस्वी होतो. कथाचं नसली तर प्रेक्षक चित्रपटाकडे पाठ फिरवतात. या तिन्ही चित्रपटांबद्दलही हेच झाले, असे अजय म्हणाला. निर्माता-दिग्दर्शकांनी या चित्रपटांच्या स्क्रिप्टवर काम केले असते तर हे तिन्ही चित्रपट हिट ठरले असते, हे सांगायलाही तो विसरला नाही.

अर्थात अजयने जे सांगितले ते खोटे नाही. गेल्या काही महिन्यांत अनेक लहान चित्रपटांनी बम्पर कमाई केली आहे. मग तो आयुष्यमान खुराणाचा ‘अंदाधुंद’, ‘बधाई हो’ असो की विकी कौशलचा ‘उरी’ किंवा मग कार्तिक आर्यनचा ‘सोनू की टीटू की स्वीटी’. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्सआॅफिसवर अनपेक्षित यश मिळवत जाणकारांना आश्चर्याचा धक्का दिला. या तिन्ही चित्रपटांच्या यशामागे त्याची कथा हेच कारण होते. अजय देवगणला हे कळले आहे, आता तिन्ही खानांनाही हे कळावे, इतकीच इच्छा.

टॅग्स :अजय देवगणआमिर खानशाहरुख खानसलमान खान