Join us  

रितेश देशमुखला दिसला अजय देवगणचा ‘कुत्रा’; तुम्ही पाहिला?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 2:49 PM

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आपल्या कॉमिक टायमिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्याचे सोशल अकाऊंटही असेच मजेशीर फोटो व धम्माल व्हिडिओंनी भरलेले आहे. अलीकडे रितेशने  ट्विटरवर एक ७ सेकंदाचा टिक टॉक व्हिडीओ शेअर केला.

ठळक मुद्दे लवकरच रितेश व अजय देवगण ‘टोटल धमाल’ या चित्रपटात दिसणार आहेत. माधुरी दीक्षित आणि अर्शद वारसी हेही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आपल्या कॉमिक टायमिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्याचे सोशल अकाऊंटही असेच मजेशीर फोटो व धम्माल व्हिडिओंनी भरलेले आहे. अलीकडे रितेशने  ट्विटरवर एक ७ सेकंदाचा टिक टॉक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओत चालत्या ऑटोवर एक कुत्रा रूबाबात उभा दिसतोय. चालत्या ऑटोवर उभा असलेला हा कुत्रा पाहून तुम्हाला कुणाची आठवण येवो ना येवो, पण रितेशला ती आली. कुणाची? तर अजय देवगणची. होय, हा व्हिडिओ पाहून रितेशला  अजयच्या ‘फुल और कांटे’ या चित्रपटातील ‘त्या’ आयकॉनिक सीनची आठवण झाली. (तोच तो, ज्यात अजय दोन चालत्या बाईकवर उभा राहून गाणे गातो) मग काय रितेशने या व्हिडिओत अजयला टॅग करत, ‘मी आत्ताच तुझा कुत्रा पाहिला...’, असे लिहिले.

आता रितेशच्या या जोकवर अजय शांत कसा बसणार? त्यानेही रितेशची फिरकी घेण्याची संधी सोडली नाही. रितेशच्या या व्हिडीओच्या बदल्यात अजयने एका पक्षाचा फोटो शेअर करत, ‘होय, ज्याप्रमाणे हा पक्षी माझा आहे...,’असे लिहिले. या फोटोतला पक्षीही अजयच्या ‘फुल और कांटे’ स्टाईलने बसलेला दिसतोय.

तूर्तास अजय व रितेशच्या या फनी जोक्सवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. युजर्सनी यावर एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. लवकरच रितेश व अजय देवगण ‘टोटल धमाल’ या चित्रपटात दिसणार आहेत. माधुरी दीक्षित आणि अर्शद वारसी हेही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. ‘धमाल’सीरिजचा हा तिसरा भाग आहे. या सीरिजचा पहिला भाग २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर २०११ मध्ये ‘डबल धमाल’ या सीक्वलने बॉक्स आॅफिसवर धूम केली होती.

टॅग्स :रितेश देशमुखअजय देवगण