Join us  

लेक न्यासा झाली ट्रोल! असा भडकला ‘सिंघम’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 9:00 PM

सोशल मीडियावर सध्या स्टार्स इतकीच स्टारकिड्सचीही चर्चा होते. रोज नव-नव्या स्टार्सकिड्चे फोटो व्हायरल होतात आणि अनेकदा ते ट्रोलही होतात. अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा ही सुद्धा अशाच स्टारकिड्सपैकी एक.

ठळक मुद्देन्यासा तूर्तास सिंगापूरमध्ये शिक्षण घेते. सुट्टीत मुंबईला आल्यावर ती अनेकदा कुटुंबासोबत दिसते. याचदरम्यान न्यासा बॉलिवूडमध्ये एन्टी करणार, अशाही बातम्या येत राहतात.

सोशल मीडियावर सध्या स्टार्स इतकीच स्टारकिड्सचीही चर्चा होते. रोज नव-नव्या स्टार्सकिड्चे फोटो व्हायरल होतात आणि अनेकदा ते ट्रोलही होतात. अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा ही सुद्धा अशाच स्टारकिड्सपैकी एक.  मम्मी-पापाइतकीच न्यासा सुद्धा सतत चर्चेत असते. अनेकदा ती ट्रोलही होते. अलीकडे न्यासा तिच्या एअरपोर्ट लूकवरून अशीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आणि ‘सिंघम’ चवताळला.

मग काय, लेकीला ट्रोल करणाऱ्यांना अजयने सणसणीत उत्तर दिले. तुम्ही मला जज करा, काजोलला जज करा. पण माझ्या मुलांना अजिबात जज करू नका. काजोल आणि मी कलाकार आहोत. आमच्या कामावरून तुम्ही आम्हाला जज करू शकता. आमची मुले आमच्यामुळे चर्चेत येतात. त्यांना विनाकारण जज करणे योग्य नाही. मी सुद्धा असाच जजमेंटल होऊन तुमच्याबद्दल बोललो तर नक्कीच तुम्हाला वाईट वाटेल. माझ्या मुलांबद्दलही असेच आहे, असे अजय म्हणाला. यापूर्वीही न्यासाला ट्रोल करणा-यांवर अजय बिथरला होता. पण त्याचा काही एक परिणाम झाला नाही. आता अजयच्या या तंबीचा ट्रोलर्सवर किती परिणाम होतो, ते बघूच.

न्यासा तूर्तास सिंगापूरमध्ये शिक्षण घेते. सुट्टीत मुंबईला आल्यावर ती अनेकदा कुटुंबासोबत दिसते. याचदरम्यान न्यासा बॉलिवूडमध्ये एन्टी करणार, अशाही बातम्या येत राहतात. पण तूर्तास तरी न्यासाचा बॉलिवूडमध्ये येण्याचा काहीही इरादा नाही. अजयबद्दल सांगायचे तर लवकरच त्याचा ‘टोटल धमाल’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय. सध्या अजय याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. ‘धमाल’ फ्रेंचाइजीचा हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगण, माधुरी दीक्षिती, अनिल कपूर, रितेश देखमुख अशी भलीमोठी स्टारकास्ट आहे.

टॅग्स :अजय देवगणकाजोल