Join us  

अरे देवा, अजय देवगणने नाकारला राजमौलींचा चित्रपट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 8:00 PM

‘ट्रिपल आर’ या चित्रपटात राजमौली अजयला घेऊ इच्छित होते. पण ताजी खबर मानाल तर अजयने राजमौलींची ही आॅफर धुडकावून लावली.

ठळक मुद्दे ‘बाहुबली’ दिग्दर्शक राजमौली यांच्या ‘ट्रिपल आर’बद्दल सांगायचे तर हा एक बिग बजेट चित्रपट आहे. यात साऊथ सुपरस्टार रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत.

भारतीय सिनेमात दिग्दर्शक राजमौली आणि सुपरस्टार अजय देवगणचे नाते बरेच जुने आहे. फार क्वचित लोकांना ठाऊक असेल की, अजय व काजोलने तामिळ ब्लॉकबस्टर ‘ईगा’ (मक्खी)च्या हिंदी रिमेकला आपला आवाज दिला होता. हा चित्रपट राजमौली यांचा होता. तेव्हापासून राजमौली व अजय देवगण एकमेकांना ओळखतात. कदाचित याच जुन्या दोस्तीखातर राजमौलींनी आपल्या आगामी चित्रपटासाठी अजयशी संपर्क साधला होता. ‘ट्रिपल आर’ या चित्रपटात राजमौली अजयला घेऊ इच्छित होते. पण ताजी खबर मानाल तर अजयने राजमौलींची ही आॅफर धुडकावून लावली. अर्थात यामागे कुठली नाराजी नाही तर तारखांची अडचण हे कारण आहे.

होय, सध्या अजयकडे मोठमोठे प्रोजेक्ट आहेत. नव्या चित्रपटाला देण्यासाठी त्याच्याकडे डेट्स नसल्याने त्याला म्हणे राजमौलींना नकार द्यावा लागला. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक शंकर यांच्या ‘इंडियन 2’ या चित्रपटाची आॅफरही अजयने अशीच नाकारली होती. अर्थात त्यामागे वेगळे कारण होते. ‘सिंघम’ सारखे पात्र साकारल्यानंतर एका भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याची भूमिका अजयला साकारायची नव्हती.

‘बाहुबली’ दिग्दर्शक राजमौली यांच्या ‘ट्रिपल आर’बद्दल सांगायचे तर हा एक बिग बजेट चित्रपट आहे. यात साऊथ सुपरस्टार रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. अर्थात अजयने नकार दिल्यानंतर राजमौलींनी या दोघांना साईन केले आहे. हे दोन्ही सुपरस्टार यात भावाच्या भूमिकेत असतील. यातला एक पोलिस अधिकारी तर दुसरा गँगस्टर असेल.‘बाहुबली’नंतर राजमौलींचा हा पहिला प्रोजेक्ट आहे. साहजिकच सगळ्यांना त्यांच्या या चित्रपटाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :अजय देवगणएस.एस. राजमौली