Join us  

हम दिल दे चुके सनमचे चाहते असाल तर वाचा ही बातमी, या चित्रपटातील जोडी पुन्हा आली एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 6:03 PM

हम दिल दे चुके या चित्रपटातील जोडी अनेक वर्षांनी एका चित्रपटासाठी एकत्र आली आहे.

ठळक मुद्देआता गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात अजय देवगणची एंट्री झाली आहे. अजयने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात केली आहे. अजय या चित्रपटात छोट्याशा पण अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

हम दिल दे चुके सनम या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडले होते. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकारांचे अभिनय सगळे काही प्रेक्षकांना भावले होते. या चित्रपटातील दिग्दर्शन आणि अभिनेत्याची जोडी अनेक वर्षांनी एका चित्रपटासाठी एकत्र आली आहे.

संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या हम दिल दे चुके सनम या चित्रपटात अजय देवगणने काम केले होते. त्यानंतर ते दोघे कोणत्याच चित्रपटासाठी एकत्र आले नाहीत. पण आता गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात अजय देवगणची एंट्री झाली आहे. अजयने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात केली आहे. अजय या चित्रपटात छोट्याशा पण अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात करिम लाला ही भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे अजय करिम लालाच्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा रंगली आहे. पण या चित्रपटाच्या टीमने अजयच्या भूमिकेबाबत मौन राखणेच पसंत केले आहे. 

हुसैन जैदीचे पुस्तक 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई'मध्ये गंगूबाईची कहाणी आहे आणि याच पुस्तकावर आधारित या चित्रपटाची कथा असणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात डॉन गंगूबाईची कथा दाखवण्यात आली आहे आणि चित्रपटात आलिया भट डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. गंगूबाई साठच्या दशकात मुंबई माफियात मोठे नाव होते. असे सांगितले जाते की तिच्या नवऱ्याने तिला फक्त ५०० रुपयांसाठी विकले होते.

टॅग्स :अजय देवगण