Join us  

अजय देवगने केली इतक्या लाखांची मदत दिग्दर्शक म्हणाले, 'तू खऱ्या आयुष्यात ही सिंघम'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 1:39 PM

देशात परिस्थिती अतिशय भयाण असून अनेकजण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगातील १८० पेक्षा जास्त देशांना विळख्यात घेतलं आहे. काही दिवसात जगातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० लाखांहून अधिक होणार असून या महामारीत मृत्यू झालेल्यांची संख्या ५० हजारांच्या वर पोहचणार आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. देशात परिस्थिती अतिशय भयाण असून अनेकजण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींन पीएम केअर फंडला डोनेशन दिले आहे. बॉलिवूड सिंघम अजय दवेगणने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजला मदतीचा हात पुढे केला आहे. या संस्थेशी जवळपास 5 लाख लोक जोडली गेलेली आहेत. यातील बहुतेक लोक रोजंदरीवर काम करुन आपलं पोट भरतात. अजयने या लोकांसाठी 51 लाखांची आर्थिक मदत केली आहे. अजयसोबत रोहित शेट्टीने देखील 51 लाख डोनेट केले आहेत. 

या संस्थेचे प्रमुख दिग्दर्शक अशोक पंडित यानी एक व्हिडीओच्या माध्यमातून दोघांचे आभार मानले.  या व्हिडीओत ते म्हणाले आहेत की, प्रिय अजय देवगण, तू दिलेल्या 51 लाखांच्या मदतीसाठी तुझे आभार. तू वेळोवेळी मदत करुन हे दाखवून दिले आहेस की खऱ्या आयुष्यातही तू 'सिंघम' आहेस. देवाची कृपा तुझ्यावर नेहमीच असू देत. याचसोबत त्यांनी रोहित शेट्टीचे देखील आभार मानले आहेत.   

 याआधी सलमान खानने २५ हजार कामगारांचे बँक डिटेल्स मागवले असून तो त्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. यापूर्वी करण जोहर, आयुष्यमान खुराना, कियारा अडवाणी, तापसी पन्नू, सिद्धार्थ मल्होत्रा, नितेश तिवारी हे देखील कामगारांच्या मदतीसाठी पुढे आले होते.

टॅग्स :अजय देवगणरोहित शेट्टीकोरोना वायरस बातम्या