अजयला भोवली पान मसाल्याची जाहिरात...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 06:21 IST
पान मसाल्याची जाहिरात करणे अजय देवगनला महाग पडण्याची चिन्हे आहेत. दिल्ली सरकारने याप्रकरणी त्याला नोटीस बजावले आहे. सिगारेट आणि ...
अजयला भोवली पान मसाल्याची जाहिरात...!
पान मसाल्याची जाहिरात करणे अजय देवगनला महाग पडण्याची चिन्हे आहेत. दिल्ली सरकारने याप्रकरणी त्याला नोटीस बजावले आहे. सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा २००३ च्या कलम ५ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली. गुटखा, तंबाखू व तत्सम पदार्थाच्या जाहिरातील अभिनेत्यांची उपस्थितीतून समाजात चुकीचा संदेश जातो. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानीकारक असल्याने समाजहिताच्यादृष्टीने अशा जाहिराती करणे थांबवावे,असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.