ऐश्वर्याने बनविली अशी भाजी की पती अभिषेक बच्चनने मांडली आपली व्यथा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 21:45 IST
अभिनेता अभिषेक बच्चन याने सार्वजनिकरीत्या पत्नी ऐश्वर्याबद्दल असा काही खुलासा केला की, सगळेच दंग राहिले. अभिषेकने एक ट्विट केले, ...
ऐश्वर्याने बनविली अशी भाजी की पती अभिषेक बच्चनने मांडली आपली व्यथा!
अभिनेता अभिषेक बच्चन याने सार्वजनिकरीत्या पत्नी ऐश्वर्याबद्दल असा काही खुलासा केला की, सगळेच दंग राहिले. अभिषेकने एक ट्विट केले, ज्यामध्ये तो पत्नी ऐश्वर्याची बदनामी करताना दिसत आहे. त्याचे झाले असे की, अभिषेकने ब्रोकोली खान्याबद्दल आपली नापसंती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे त्याने हे ट्विट करताना ब्रोकोली डिशचा एक फोटोही शेअर केला. कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘Talk about #MurphysLaw Guess the Mrs. read my last post।’ याचा अर्थ त्याला असे सांगायचे आहे की, मिसेज म्हणजेच ऐश्वर्याने अखेरची पोस्ट वाचली होती आणि आता त्याला हे खाण्यास मिळत आहे. अभिषेकला ब्रोकोली खाने पसंत नाही. त्यामुळेच त्याने एक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्याने, ‘Why?? Why would anybody do such a thing? WHY??’ असे लिहिले होते.'I mean…. Who even likes broccoli?!' त्याच्या याच पोस्टनंतर ऐश्वर्याने त्याला ब्रोकोलीची भाजी खाण्यास दिली. ज्यास खाताना अभिषेकने हे सांगितले की, त्याची अखेरची पोस्ट ऐश्वर्याने वाचल्यामुळेच मला ही भाजी खाण्यास दिली आहे. अभिषेकच्या या पोस्टवर चाहते त्याला याबाबतचा सल्ला देत आहेत की, पत्नी जे खाण्यास देईल ते निमुटपणे खाऊन त्यात आनंद मानायला हवा. अभिषेक ऐश्वर्याच्या लग्नाला अकरा वर्षे झाली आहेत. २००७ मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. या दाम्पत्याला सहा वर्षांची आराध्या नावाची मुलगीही आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिषेक सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होताना दिसला. एका ट्रोलरने ट्विट करून अभिषेकची तुलना क्रिकेटर रोजर बिन्नीचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीशी केली होती. त्याने लिहिले होते की, स्टुअर्ट बिन्नी बॉलिवूडच्या अभिषेक बच्चनचा रिप्लिका आहे. कारण दोघांनाही सुंदर पत्नी असून, आपल्या वडिलांच्या यशामुळे चित्रपट/किक्रेटमध्ये टिकून आहेत. दोघेही यूजलेस आहेत. या ट्विटच्या उत्तरात अभिषेकने लिहिले की, ‘माझे शूज घालून एक मील चालून दाखव माझा भावा. जर तू दहा पावले चालून दाखविले तरी मी तुला मानणार. मला जज केल्यापेक्षा तुझ्याकडे जो वेळ आहे, तो वेळ स्वत:ला सुधारण्यासाठी वापर. दुसºयांची काळजी करणे सोडून दे. गेट वेल सून.’ खरं तर अभिषेक पहिल्यांदाच ट्रोलरला अशाप्रकारचे उत्तर दिले असे नाही, तर यापूर्वीही त्याने बºयाचदा ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. सध्या अभिषेक अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जियां’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.