Join us

ऐश्‍वर्या इन मल्टीस्टारर प्रोजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 08:35 IST

ऐश्‍वर्या इन मल्टीस्टारर प्रोजेक्ट'जज्बा'द्वारे अभिनेत्री ऐश्‍वर्या रॉय बच्चन हिने तब्बल पाच वर्षांनंतर कमबॅक केले. ती सध्या दोन चित्रपटांसाठी ...

ऐश्‍वर्या इन मल्टीस्टारर प्रोजेक्ट'जज्बा'द्वारे अभिनेत्री ऐश्‍वर्या रॉय बच्चन हिने तब्बल पाच वर्षांनंतर कमबॅक केले. ती सध्या दोन चित्रपटांसाठी शूटिंग करत असून या चित्रपटात बहुविध कलाकारांचा भरणा आहे. ती सध्या 'ऐ दिल है मुश्किल' आणि 'सरबजीत' चित्रपटासाठी शूट करतेय. बॉलीवूडमधील दोन हॉटेस्ट स्टार्ससोबत ती काम करत आहे. त्या दोघांसोबत काम करण्यासाठी माजी विश्‍वसुंदरी उत्सुक आहे. तिचे कॅरेक्टर अगदीच वेगळे असून तीन वेगवेगळ्या व्यक्तीरेखा तिला स्क्रीनवर एकावेळी पहावयास मिळणार आहेत. इतर दोन अभिनेत्रीही ऐश्‍वर्यासोबत स्क्रिन शेअर करत आहेत.