ऐश्वर्या रायच्या 'फन्ने खां'चा बॉक्स ऑफिसवर 'या' चित्रपटासोबत होणार सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 12:18 IST
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा आगामी चित्रपट फन्ने खाँची रिलीज डेट समोर आली आहे. ऐश्वर्या, अनिल कपूर आणि ...
ऐश्वर्या रायच्या 'फन्ने खां'चा बॉक्स ऑफिसवर 'या' चित्रपटासोबत होणार सामना
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा आगामी चित्रपट फन्ने खाँची रिलीज डेट समोर आली आहे. ऐश्वर्या, अनिल कपूर आणि राजकुमार रावचा हा चित्रपट 3 ऑगस्टला रसिकांच्या भेटीला येणार आहे. तसेच इरफान खानचा 'कारवां' देखील याच दिवशी रिलीज होणार आहे. आधी हा चित्रपट 10 ऑगस्टला रिलीज होणार होता. मात्र आता या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. ''फन्ने खां' मध्ये मी साधी सरळ भूमिका करत आहे. जी लहान सहान गोष्टीवर सुद्धा पटकन विश्वास ठेवते." हा एक क म्युझिकल कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाला अतुल मांजरेकर दिग्दर्शित करीत आहेत.‘फन्ने खां’ आॅस्कर नॉमिनेटेड ‘एव्हरीबडी इज फेमस’ या डच चित्रपटाचा आॅफिशियल रिमेक आहे. चित्रपटात ऐश्वर्या एका गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात 3 गाणी ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आली आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीलाच ऐश्वर्याची एंट्री एका डान्स साँगसोबत होणार आहे. यात ऐश्वर्या राजकुमार रावसोबत रोमांस करताना दिसणार आहे. तर दोन दशकांनतंर ऐश्वर्या अनिल कपूरसोबत काम करणार आहे. कारवांमध्ये इरफान खानसोबत सलमान आणि मिथिला पालकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. यात कृती खरबंदा सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा तीन अनोळखी लोकांभावती फिरते. ज्याची एकमेकांशी ओळख चुकून होते. या चित्रपटाचे अधिकतर शूटिंग केरळमध्ये करण्यात आले आहे. हा एका कॉमेडी चित्रपट आहे. साऊथमधला सलमान हा अभिनेता या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे. तर मिथिला पालकरचा ही हा पहिलाच चित्रपट आहे. एंडोक्राईन ट्यूमरचे निदान झाल्यानंतर इरफानचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी ब्लैकमेल त्याचा रिलीज झाला आहे.