Join us  

Ponniyin Selvan 2 Trailer: ऐश्वर्या रायच्या ‘पोन्नियिन सेल्वन २’चा ट्रेलर रिलीज, पाहून तुम्हीही म्हणाल जबरदस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 11:33 AM

Ponniyin Selvan 2 : ‘पोन्नियिन सेल्वन २’ या सिनेमाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर ‘पोन्नियिन सेल्वन २’चा ट्रेलर रिलीज झाला.

Ponniyin Selvan 2 Trailer: दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ‘पोन्नियिन सेल्वन’चा दुसरा भाग (Ponniyin Selvan 2 ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर ‘पोन्नियिन सेल्वन २’चा ट्रेलर रिलीज झाला. काल बुधवारी चेन्नईमधील नेहरू स्टेडियममध्ये लाँच करण्यात आला. ऐश्वर्या राय (Aishwarya Rai ) व चियान विक्रम स्टार पीएस २ चा ट्रेलर पाहताना अंगावर रोमांच येतात. राजकुमारी नंदीनी बनलेल्या ऐश्वर्याने पहिल्या पार्टमध्ये चोल साम्राज्याचा खात्मा करण्याची प्रतिज्ञा केली होती. सेकंड पार्टमध्ये राजकुमारी नंदिनी ही प्रतिज्ञा पूर्ण करताना दिसणार आहे. यावेळी राजसिंहासनासाठी तुंबड महायुद्ध पाहायला मिळणार आहे. याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.  ट्रेलरमधील भव्यदिव्य सेट आणि थक्क करणारे सीन्स जबदस्त आहेत. रिलीज होताच पीएस २ चा ट्रेलर सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. चाहते ट्रेलरचं कौतुक करताना थकत नाहीयेत. राजकुमारी नंदिनी आणि आदित्य हे समोरासमोर येतात, तो ट्रेलरमधला एक सीन खिळवून ठेवतो. दोघांचीही केमिस्ट्री पाहाण्यासारखी आहे.

 पोन्नियिन सेल्वन1 मध्ये चोल सम्राट राजराजा 1 अरुलमोझिवर्मन (पोन्नियिन सेल्वन- (947-1014)) यांच्या सुरुवातीच्या जीवनाची कथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटात जयम रवी हे अरुलमोझिवर्मनच्या भूमिकेत होते. तर विक्रम, कार्ती, त्रिशा आणि ऐश्वर्या यांनी इतर महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. 

पीएस- 1 या चित्रपटाने जगभरात 500 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता. तमिळनाडूमध्ये हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. कमल हासन यांच्या ‘विक्रम’ या चित्रपटाचा रेकॉर्ड पीएस-1 ने मोडला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने ऐश्वर्या रायने जवळपास दशकभरानंतर तमिळ सिनेसृष्टीत पुनरागमन केलं. यामध्ये तिने नंदिनी आणि तिची मूक आई मंदाकिनी देवी अशा दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. हिल्या भागातील तिच्या दमदार अभिनयाची प्रेक्षक-समिक्षकांकडून प्रशंसा झाली होती. पोन्नियिन सेल्वन 2 हा चित्रपट येत्या 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनमणी रत्नमबॉलिवूड