Join us  

Throwback Video : अगं बाई हे काय? ऐश्वर्या रायने लाजत गायलं हे गाणं...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 11:47 AM

ऐश सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टीव्ह नसली तरी तिचे फोटो आणि व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. सध्या ऐश्वयाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ठळक मुद्दे2018 मध्ये ‘फन्ने खाँ’ हा तिचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून तिचा एकही चित्रपट रिलीज झालेला नाही.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. ऐश सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टीव्ह नसली तरी तिचे फोटो आणि व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. सध्या ऐश्वयाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या ‘तेरी याद हमसफर सुबह शाम’ हे गाताना दिसत आहे.  तिच्यासोबत अभिनेता चंद्रचूड सिंगही या व्हिडीओत दिसतोय.‘तेरी याद हमसफर सुबह शाम’ हे गाणे ऐश्वर्याच्याच ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातील गाणे आहे. याच चित्रपटातून ऐश्वर्याचा डेब्यू झाला होता. 1997 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात ऐश्वर्या व बॉबी देओल मुख्य भूमिकेत होते. ऐश्वर्याचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी भरभरून कमेंट्स दिल्या आहेत. अनेकांनी ऐश्वर्यात असलेल्या सिंगींग टॅलेंटचेही कौतुक केले आहे.

  काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याने तिचा ४६ वा वाढदिवस साजरा केला. ऐश्वर्याच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  

बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणा-या ऐश्वर्याने 2011 मध्ये गर्भवती झाल्यामुळे चित्रपटांमधून ब्रेक घेतला. नंतर 2015 मध्ये संजय गुप्ताच्या ‘जज्बा’ या चित्रपटाद्वारे तिने कमबॅक केला होता. पुढच्याच वर्षी ‘ऐ दिल है मुश्किल’ मध्ये ती झळकली होती.  

2018 मध्ये ‘फन्ने खाँ’ हा तिचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून तिचा एकही चित्रपट रिलीज झालेला नाही. मध्यंतरी ऐश्वर्या ‘गुलाब जामुन’ या   चित्रपटात ऐश्वर्या दिसणार असल्याची चर्चा रंगली होती.  यात तिच्यासोबत पती अभिषेक बच्चनचीही भूमिका असल्याचे म्हटले गेले होते. मात्र अद्याप या चित्रपटाची घोषणा झालेली नाही.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन