Join us  

Happy Birthday: सलमानच्या आधी ऐश्वर्या रायचे या व्यक्तिवर जडले होते पहिलं प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 12:34 PM

ऐश्वर्याने हे रिलेशनशीप मीडियासमोर कधीच कबूल केले नाही.

ऐश्वर्या राय आज आपला 46 वा वाढदिवस साजरा करते आहे. मणिरत्नम यांच्या ‘इरूवर’ चित्रपटातून ऐश्वर्याच्या रूपेरी कारकीर्दीस सुरूवात झाली. बॉबी देवलसोबतचा ‘और प्यार हो गया’हा तिचा पहिला हिंदी चित्रपट.

दक्षिणेतील दिग्दर्शक एस. शंकर यांचा ‘जीन्स’ या चित्रपटातून तिने बहुभाषक चित्रपटातून काम केले. विश्वसुंदरीचा किताब पटकावणारी ऐश्वर्या रॉय बच्चनचे करोडो चाहते आहेत. ऐश्वर्याच्या प्रोफेशनल लाईफ इतकिच पर्सनल लाईफदेखील चर्चेत राहिली. 

 ऐश्वर्याचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले आणि तिचे नाव सलमान खानशी जोडले गेले होते. पण ऐश्वर्या राय मॉडेलिंग करत असताना ती राजीव मूलचंदानीसोबत रिलेशनशीपमध्ये होती हे खूप कमी जणांना माहिती आहे. ऐश्वर्याने हे रिलेशनशीप कधीच मीडियात कबूल केली नाही.विश्वासुंदरी झाल्यानंतर ऐश्वर्याचे बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले.

जशी जशी या क्षेत्रात ती यशस्वी होत गेली तसे तिने राजीवला टाळायला सुरुवात केली. राजीवनंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमानची एंट्री झाली आणि पुढचा इतिहास सगळ्यांना माहितीच आहे. सलमानशी ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेक आला पण हे नातंसुद्धा खूप काळ टिकले नाही. त्यानंतर गुरुच्या सेटवर सुरु झाली ती ऐश्वर्या आणि अभिषेकची लव्हस्टोरी. गुरू सिनेमाच्या प्रीमियरनंतर टोरंटोमध्ये अभिषेकने लग्नासाठी ऐश्वर्याला प्रपोज केले होते. ऐश्वर्याने ही अभिषेकने केलेले प्रपोजल लगेच स्वीकारले आणि  2007 मध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.   

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चन