Join us  

ऐश्वर्याच्या ‘डुप्लिकेट’ने केले बोल्ड फोटोशूट, पाहून व्हाल ‘क्लीनबोल्ड’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 8:00 AM

अभिनेत्री ऐश्वर्या रायची ‘डुप्लिकेट’ म्हणून ओळखली जाणारी ही अभिनेत्री सध्या जाम चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे, तिचे बोल्ड फोटोशूट.

ठळक मुद्देअगदी अलीकडे स्रेहाला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अभिनेत्री ऐश्वर्या रायची ‘डुप्लिकेट’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री स्रेहा उल्लाह सध्या जाम चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे, तिचे बोल्ड फोटोशूट. सध्या स्रेहाचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.दीर्घकाळापासून स्रेहा मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. पण सोशल मीडियावर मात्र ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. स्वत:चे रोज नवे हॉट फोटो ती शेअर करत असते. ताज्या फोटोशूटचे अनेक फोटो स्रेहाने  शेअर केले आहेत. या फोटोतील स्नेहाच्या अदा वेड लावणा-या आहेत.

काही दिवसांपूर्वी स्रेहा तिच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत होती, ऑल इंडिया मिक्स्ड मार्टिकल आर्ट्स असोसिएशनचा चेअरमन अवी मित्तल व स्नेहा दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. पण नुकताच दोघांनीही आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला. 

२००५ मध्ये सलमान खानने स्रेहाला ब्रेक दिला होता. ‘लकी- नो टाईम फॉर लव्ह’ या चित्रपटातून स्नेहाने सलमानसोबत डेब्यू केला होता. पण यानंतर स्रेहा बॉलिवूडमध्ये फार कमाल दाखवू शकली नाही.

२००६ मध्ये सोहेल खानसोबत ‘आर्यन’मध्ये ती झळकली. यानंतर २०१० मध्ये ‘क्लिक’ या चित्रपटात श्रेयस तळपदेसोबत दिसली. पण हे दोन्ही चित्रपट दणकून आपटले.

यानंतर स्नेहा साऊथच्या चित्रपटांकडे वळली. तेलगू व कन्नड चित्रपटांत ती दिसली. पण  गत चार वर्षांपासून ती अचानक  चित्रपटांपासून दूर झाली.

कारण याकाळात  स्नेहाला एका आजाराने ग्रासले होते. स्नेहा ऑटोइम्यून डिसऑर्डरनेने पीडित होती. हा एक रक्तासंदभार्तील आजार आहे. यामुळे स्नेहा प्रचंड अशक्त झाली होती.

इतकी की, खूप वेळ आपल्या पायांवर उभीही राहू शकत नव्हती. त्याचमुळे ती चित्रपटांपासून दूर राहिली. अगदी अलीकडे स्रेहाला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनसलमान खान