ऐश्वर्या राय बच्चनचा हॉट अॅण्ड ग्लॅमरस अवतार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST
ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा तिच्या ग्लॅमरस अवतारात परतली आहे. विश्वास बसत नसेल तर नव्या फोटोशूटमधील तिचा ग्लॅमरस अवतार तुम्ही बघायलाच हवा.
ऐश्वर्या राय बच्चनचा हॉट अॅण्ड ग्लॅमरस अवतार!
ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा तिच्या ग्लॅमरस अवतारात परतली आहे. विश्वास बसत नसेल तर नव्या फोटोशूटमधील तिचा ग्लॅमरस अवतार तुम्ही बघायलाच हवा.ऐश्वर्याने गार्जिया इंडिया नावाच्या एका लोकप्रीय मॅगझिनसाठी हॉट फोटोशूट केले आहे. यातील काही फोटो गार्जिया इंडियाने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत. मॅगझिनच्या ताज्या अंकाच्या कव्हरपेजवर ऐश्वर्या दिसणार आहे. यात ऐश्वर्या डिझाईनर नाईटसूटमध्ये दिसणार आहे. ऐश्वर्याचे लग्न होऊन अनेक वर्षे झालीत. पण तिचा चार्म जराही कमी झालेला नाही. कदाचित त्याचमुळे मॅगझिनच्या ‘१०० मोस्ट इन्फ्लूएंशिअल’ नावाने येणाºया या विशेष अंकात ऐश्वर्या कव्हरपेजवर दिसणार आहे. आपल्या फॅशनने लोकांना प्रभावित केलेल्या १०० लोकांना मॅगझिनने आपल्या ताज्या अंकात सामील केले आहे. ऐश्वर्याही यातलीच एक़ऐश्वर्याचा फॅशनसेन्स जबरदस्त आहे. विशेष म्हणजे, इव्हेंटचे महत्त्व ओळखून ती फॅशन करते. हेच तिच्या फॅशनचे वैशिष्ट्य आहे. ग्लॅमरसया फोटोशूटमध्ये ऐश्वर्या प्रचंड ग्लॅमरस दिसतेय. ऐश्वर्या लवकरच ‘फॅनी खान’ या चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वी ऐश्वर्या रणबीर कपूरसोबत ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात दिसली होती.