Join us  

15 वर्षांपूर्वी ऐश्वर्या रायने केले होते फोटोशूट, आत्ता फोटो होत आहेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2020 3:56 PM

थ्रोबॅक फोटो

ठळक मुद्देमणिरत्नम यांच्या ‘इरूवर’ चित्रपटातून ऐश्वर्याच्या रूपेरी कारकीर्दीस सुरूवात झाली.

सौंदयार्ची खाण म्हणजे ऐश्वर्या राय.  दाक्षिणात्य कुटुंबात जन्मलेली ऐश्वर्या मूळची मल्याळम. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा. ऐश्वर्याच्या जन्मानंतर राय कुटुंब मुंबईत स्थायिक झाले.  ऐश्वयाचे अख्खे बालपण मुंबईत गेले आणि याच मुंबईत राहून तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. अगदी जगतसुंदरीचा किताब जिंकण्यापासून तर बॉलिवूड, हॉलिवूडची अभिनेत्री म्हणून मिरवण्यापर्यंत आणि कान्सच्या रेड कार्पेटवर मिरवण्यापर्यंतचा तिचा प्रवास डोळे दिपवणारा आहे.

या ऐश्वर्याचे काही जुने फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फॅशन डिझाईनर एश्ले रेबेलो यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ऐश्वयर्रचे हे तीन फोटो शेअर केले आहेत. 

ऐश्ले सलमान खानचे स्टाईलिस्टही आहेत. बॉलिवूडच्या दिग्गज डिझाईनरमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. एश्ले यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1992 साली ‘जो जीता वही सिकंदर’ या सिनेमापासून केली होती. याच एश्ले यांनी ऐश्वर्याचे तीन थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. 

खूप वर्षांआधीचे ऐश्वर्याचे फोटोशूट..., असे त्यांनी हे फोटो शेअर करताना लिहिले. 15 वर्षांआधी ऐश्वर्याचे हे फोटोशूट झाले होते. या फोटोशूटमध्ये ऐश्वर्या कमालीची सुंदर दिसतेय.

ऐश्वर्याने आर्किटेक्चर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. माटुंग्याच्या रूपारेल कॉलेजात तिचे शिक्षण झाले. पुढे ऐश्वर्या आपसूकच मॉडेलिंगच्या क्षेत्रात ओढली गेली. या मॉडेलिंगच्या दुनियेत वावरत असताना मिस इंडिया स्पर्धेत तिने भाग घेतला. पण या स्पर्धेत सुश्मिता सेन अव्वल ठरली आणि ऐश्वर्याला दुसरा क्रमांक मिळाला. अर्थात पुढे मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतल्यानंतर जगतसुंदरीचा मुकूट तिच्या डोक्यावर सजला. मिस इंडिया, मिस वर्ल्ड स्पर्धेनंतर बॉलिवूडमध्ये ती आली.

मणिरत्नम यांच्या ‘इरूवर’ चित्रपटातून ऐश्वर्याच्या रूपेरी कारकीर्दीस सुरूवात झाली. बॉबी देवलसोबतचा ‘और प्यार हो गया’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. दक्षिणेतील दिग्दर्शक एस. शंकर यांचा ‘जीन्स’ या चित्रपटातून तिने बहुभाषक चित्रपटातून काम केले. तिला त्यासाठी अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला. यानंतर हम दिल दे चुके सनम, देवदास, ताल, चोखेर बाली, रेनकोट, जोधा अकबर असे अनेक हिट सिनेमे तिने दिलेत. हॉलिवूड सिनेमांतही तिची वर्णी लागली. कान्स चित्रपट महोत्सवात ज्युरी बनण्याचा मान मिळालेली ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन