Join us  

ऐश्वर्या राय बच्चनने 'ह्या' कारणासाठी 'जॅस्मीन' सिनेमात काम करण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 3:14 PM

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने 'जॅस्मीन' चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. या चित्रपटाच्या पटकथेत कमतरता असल्यामुळे तिने हा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे.

ठळक मुद्दे'जॅस्मीन' या चित्रपटात एका सरोगेट आईची कथा

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने 'जॅस्मीन' चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. या चित्रपटाच्या पटकथेत कमतरता असल्यामुळे तिने हा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे.

बॉलिवूडची अॅश म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने काही दिवसांपूर्वी नक्की केले होते की लेखक सिद्धार्थ आणि गरिमा यांच्या जॅस्मीन चित्रपटाची कन्सेप्ट आवडली होती.मात्र त्यावेळी तिने चित्रपटात काम करण्यास होकार किंवा नकारही दिला नव्हता. मात्र आता तिने निर्णय घेतला असून सूत्रांच्या माहितीनुसार तिने या सिनेमात काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याने 'जॅस्मीन' चित्रपटाची ऑफर नाकारली आहे. स्क्रीप्टमध्ये कमतरता होती. मात्र सिद्धार्थ व गरिमा यांची कल्पना खूप चांगली होती. कथेमध्ये बऱ्याच कमतरता होत्या. त्या ऐश्वर्याने लेखकाला सांगितल्या होत्या. त्यात सुधारणा केल्यानंतर नवीन स्क्रीप्टसह ऐश्वर्याला लेखकांनी संपर्क केला. पण, ऐश्वर्याला त्याच्याशी तिला रिलेट करता येत नसल्याचे वाटले आणि तिने या चित्रपटात काम करू शकत नसल्याचे सांगितले.

ऐश्वर्या राय बच्चनने 'जॅस्मीन'मध्ये काम करण्यास नकार दिल्यानंतर चित्रपटाच्या कामात अडचणी येत आहेत. निर्माते श्री नारायण सिंग या चित्रपटाची निर्मिती करणार होते. मात्र आता त्यांनी देखील निर्मिती करण्यास नकार दिला आहे. त्यांनी सांगितले की, चित्रपट आतापर्यंत फ्लोअरवर जायला हवा होता. मात्र सिद्धार्थ व गरिमा यांचे दुसरे कमिटमेंट्सदेखील आहेत ज्या पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे आता या सिनेमाचे काम पुन्हा कधी सुरू होईल, हे मी आता सांगण्यासाठी सक्षम नाही. सध्या हा सिनेमा होल्डवर आहे.'जॅस्मीन' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात एका सरोगेट आईची कथा रेखाटण्यात आली आहे आणि यात ऐश्वर्या सरोगेट आईची भूमिका साकारणार होती. मात्र आता या चित्रपटात ऐश्वर्याच्या जागी कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागेल, हे पाहणे कमालीचे ठरेल. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन