ऐश्वर्या व आराध्याने घेतले गणपती दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 15:34 IST
आघाडीची अभिनेत्री ऐश्वर्या रॉय - बच्चन ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये असतानाही आई म्हणून सर्व जबाबदारी सांभाळत आहे. तिने गर्दी असतांनाही, ...
ऐश्वर्या व आराध्याने घेतले गणपती दर्शन
आघाडीची अभिनेत्री ऐश्वर्या रॉय - बच्चन ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये असतानाही आई म्हणून सर्व जबाबदारी सांभाळत आहे. तिने गर्दी असतांनाही, मुलगी आराध्या हीस गणपतीचे दर्शन घडवून आणले. भक्तांची मोठी गर्दी असतानाही ऐश्वर्या आराध्या हीस घेऊन गेली व दर्शन केले. गणपतीची पूजा करुन दोघींनेही आशिर्वाद घेतला. सूत्रानुसार आराध्या हीस गणपती आरती व गायत्री मंत्र संपूर्ण पाठ आहे. केवळ चार वर्षाचे तिचे वय आहे. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर ऐश्वर्या खूप सावध होती. आराध्याला कधी उचलून तर कधी तिचा ती हात पकडताना दिसत होती. आपल्या फेव्हरेट अभिनेत्रीला पाहून अनेकजण उत्साहित झाले होते. ऐश्वर्यानेही त्यांना नाराज न करता, स्मित हास्य करुन त्यांना वेलकम केले. मागील ‘सरबजीत’ या चित्रपट ती होती. त्यामध्ये तिच्या अभिनयाची चाहत्यांनी मोठी प्रशंसा केली होती.