Join us

दहा वर्षांची असताना राखी सावंतने उद्योगपती अनिल अंबानींच्या लग्नात केले वेटरचे काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 20:55 IST

अभिनेत्री, डान्सर, मॉडेल आणि टीव्ही शोचे सूत्रसंचालन केलेल्या राखी सावंतने तिच्या करिअरची सुरुवात ‘अग्निचक्कर’मधून केली होती. नीरू भेद ऊर्फ ...

अभिनेत्री, डान्सर, मॉडेल आणि टीव्ही शोचे सूत्रसंचालन केलेल्या राखी सावंतने तिच्या करिअरची सुरुवात ‘अग्निचक्कर’मधून केली होती. नीरू भेद ऊर्फ राखी सावंत नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. चित्रपट ते राजकारण असा प्रवास केलेल्या राखीचे सुरुवातीचे आयुष्य खूपच संघर्षपूर्ण राहिले आहे. आज राखीने जे काही मिळविले त्यामागे तिचा संघर्ष आहे. तुम्हाला माहिती आहे काय? झगमगटात राहणारी ही राखी सावंत एकेकाळी डोअर टू डोअर सेल्स गर्ल म्हणून काम करायची. होय, राखीने सेल्स गर्लबरोबरच हॉटेलमध्ये वेटर म्हणूनही काम केले आहे. राखीच्या या प्रवासाची आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. मुंबईतील एका गरीब कुटुंबात राखीचा २५ नोव्हेंबर १९७८ रोजी जन्म झाला. तिच्या वडिलांचे नाव सावंत असे आहे, जे वरळी पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते, तर तिच्या आईचे नाव जया सावंत असे आहे. त्या दिग्दर्शक राकेश सावंत यांच्या पहिल्या पत्नी उषा सावंत यांची बहीण आहेत. राखीने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘अग्निचक्कर’मधून केली. राखीने तिच्या करिअरच्या सुरुवातीला बºयाचशा लो बजेट चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारल्या. तसेच आयटम नंबरही केले. २००३ मध्ये राखीने ‘चुरा लिया हैं तुमने’ या चित्रपटात आयटम सॉन्ग करून धूम उडवून दिली होती. पुढे तिला बºयाचशा चित्रपटांमध्ये आयटम सॉन्गच्या आॅफर मिळू लागल्या. मात्र तिला अद्यापपर्यंत एकही चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम करता आले नाही. २००५ मध्ये ती ‘परदेशिया’ या अल्बममध्ये बघावयास मिळाली. सर्वसामान्य कुटुंबात जन्मालेल्या राखीचा इथपर्यंतचा प्रवास खूपच संघर्षात्मक आहे. कारण लहान वयातच तिला काम करण्यास सुरुवात करावी लागली. ती डोर टू डोर सेल्स गर्ल म्हणून काम करीत होती. पार्ट्यांमध्ये वेटर्सचा जॉब करायची. जेव्हा राखीचे दहा वर्षांची होती, तेव्हा तिने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या लग्नात वेटर्सचे काम केले. असेही म्हटले जाते की, त्यावेळी राखीचा परिवार खूपच आर्थिक तंगीचा सामना करीत होता. राखीने अनिल अंबानी यांच्या लग्नात वेटर्सचे काम केले, परंतु त्या रात्री ती खूप रडली होती.