Join us  

करण-अर्जुन आयेंगे...!  भन्साळींच्या  चित्रपटात दिसणार शाहरुख-सलमानची जोडी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 8:49 PM

बॉलिवूडमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करणारे शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ही करण-अर्जुनची ...

बॉलिवूडमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करणारे शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ही करण-अर्जुनची जोडी लवकरच एकत्र पडद्यावर दिसणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या जोडीला एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा होती. पण हा योग जुळून आला नाही. मध्यंतरी नाही म्हणायला ही जोडी ‘बिग बॉस’चा सेटवर एकत्र दिसली. एकमेकांच्या चित्रपटात कॅमिओ करताना दिसली. पण आता अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा ही जोडी एकत्र चित्रपट करणार आहे. ती सुद्धा संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात. होय, भन्साळी शाहरुख-सलमानला एकत्र घेऊन चित्रपट बनवू इच्छितात. या चित्रपटाच्या स्क्रिप्टची तयारीही सुरु झाली असल्याचे कळतेय. स्क्रिप्टचे काम पुर्ण होताच भन्साळी शाहरुख व सलमानला भेटणार आहेत. दोघांकडून होकार येताच, या चित्रपटाचे काम सुरू होईल. सलमान व शाहरुख दोघांचेही भन्साळीसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे भन्साळींनी ते नकार देतील, याची शक्यता कमी आहे. भन्साळींचा हा चित्रपट दोन मित्रांची कथा असल्याचे तूर्तास कळते आहे. सलमानने भन्साळींच्या ‘खामोशी’, ‘हम दिल दे चुके सनम’ आणि ‘सावरियां’सारख्या चित्रपटात काम केले आहे तर शाहरुखने त्यांच्या ‘देवदास’मध्ये अभिनय केला आहे.

शाहरुख व सलमानच्या जोडी ‘करण-अर्जुन’मध्ये एकत्र दिसली होती. राकेश रोशन दिग्दर्शित ‘करण-अर्जुन’ पुनर्जन्मावर आधारित एक हिट चित्रपट होता. या चित्रपटात शाहरूख व सलमान पहिल्यांदा एकत्र दिसले होते. या चित्रपटानंतर शाहरूख व सलमान कधीच एकत्र दिसले नाहीत. अर्थात एकमेकांच्या चित्रपटात त कॅमिओ करताना दिसले. सलमानने शाहरूखच्या ‘कुछ कुछ होता है’मध्ये कॅमिओ केला. तर शाहरूख सलमानच्या ‘हर दिल जो प्यार करेगा’मध्ये कॅमिओ करताना दिसला. २००७ मध्ये शाहरूखच्याच होम प्रॉडक्शनच्या ‘ओम शांती ओम’मध्येही सलमान झळकला.

टॅग्स :शाहरुख खानसलमान खान