Join us

10 वर्षांनंतर पुन्हा एकदा या अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर करणार अर्शद वारसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 13:13 IST

जुहि चावलाच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. अर्शद वारसीच्या आगामी चित्रपटात जुही एका गेस्ट रोलमध्ये दिसणार आहे. 2008 मध्ये आलेल्या ...

जुहि चावलाच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. अर्शद वारसीच्या आगामी चित्रपटात जुही एका गेस्ट रोलमध्ये दिसणार आहे. 2008 मध्ये आलेल्या जयदीप सेन यांच्या 'क्रेजी4' मध्ये दोघांनी एकत्र काम केले होते. हा एका  सायकॉलजिकल थ्रिलरवर आधारित चित्रपट आहे. चित्रपटाचे नाव अजून नक्की झालेले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन जाहिरात क्षेत्रातील फिल्ममेकर निधिशा करते आहे. जुहीने सोमवारपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरु केले आहे. ही एका सामान्य माणसाची गोष्ट आहे. जो एका असामान्य परिस्थिती फसतो. जुहीच्या एंट्रीमुळे कथेमध्ये ट्विस्ट येणार आहे. जुहीने सांगितले या चित्रपटातील भूमिका साकारणे तिच्यासाठी आव्हानत्मक होते. जुही पुढे म्हणाली, अर्जुन पंडित, गुलाबी गँग नंतर तिचा हा तिसरा चित्रपट आहे ज्यात ती नेगेटिव्ह भूमिका साकारणार आहे. तीन दिवसांच्या शूटिंगनंतर जुही एक गाणं देखील शूट करणार आहे. चित्रपटात दिव्या दत्त अर्शद वारसीच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.  ALSO READ :   ​या कारणामुळे जुही चावलाने आमिर खानसोबत काम करण्यास दिला होता नकारजुहीने लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर राहणेच जास्त पसंत केले. ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमाद्वारे जुहीने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. आपल्या पहिल्याच सिनेमासाठी जुहीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअरचे नामांकन मिळाले होते. खरे तर ‘कयामत से कयामत तक’ हाच जुहीचा डेब्यू सिनेमा असे अनेकांना वाटते. पण नाही. १९८६ मध्ये आलेला ‘सल्तनत’ हा जुहीचा डेब्यू सिनेमा होता. यात तिने जरीनाची भूमिका साकारली होती. अर्थातच हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. यानंतर जुहीने साऊथचा दिग्गज दिग्दर्शक रविचंद्रन यांच्या ‘प्रेमलोका’मध्ये काम केले. हा चित्रपट मात्र सुपरडुपर हिट ठरला होता. यापश्चात तिचा ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट आला. यात जुही आमिर खानसोबत दिसली होती. त्यानंतर तिने ‘स्वर्ग’, ‘आइना’, ‘लुटेरा’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ या सिनेमात  ती दिसली. ‘हम है राही प्यार के’ या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. असे असतानाही जुहीने जय मेहतांसोबत लग्न केल्यानंतर चित्रपटांपासून दुरावा घेतला.