Join us

सुशांत सिंह राजपूतनंतर आर. माधवन करणार 'नासा'वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 16:02 IST

सुशांत सिंह राजपूत त्याचा आगामी चित्रपट 'चंदा मामा दूर के'मध्ये एका अंतराळवीराची भूमिका साकारणार आहे. नुकताच आपल्या भूमिकेसाठी तो ...

सुशांत सिंह राजपूत त्याचा आगामी चित्रपट 'चंदा मामा दूर के'मध्ये एका अंतराळवीराची भूमिका साकारणार आहे. नुकताच आपल्या भूमिकेसाठी तो नासाला जाऊन ट्रेनिंग घेऊन आला आहे. आपल्या फॅन्ससाठी त्यांनी ट्रेनिंग दरम्यानचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले होते. सुशांतनंतर याचित्रपटातील दुसरा अभिनेता नासाला जाऊन ट्रेनिंग घेणार आहे. साउथचा सुपरस्टार आर. माधवनदेखील सुशांतनंतर नासाला जाणार आहे. चंदा मामा दूर के मध्ये आर. माधवनची ही महत्त्वाची भूमिका आहे. मि डेशी बोलताना सुशांत म्हणाला ''नासाला जाणे म्हणजेच माझ्यासाठी लहान मुलाला डिझनीलँडला घेऊन जाण्यासारखे होते. लवकरच आर माधवनसुद्धा याचित्रपटासाठी नासाला जाऊन ट्रेनिंग घेणार आहे. नासाला जाऊन आल्यानंतर  तोदेखील तुमच्याशी त्याचा अनुभव शेअर करेल.'' याचित्रपटासाठी श्रद्धा कपूरचे नाव देखील समोर येतेय. या चित्रपटात ती सुद्धा अंतराळ यात्री बनण्याची शक्यता आहे. मात्र चित्रपटाच्या निर्मात्याकडून अजून तिच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.ALSO READ : ‘फन्ने खान’मध्ये साउथचा ‘हा’ सुपरस्टार करणार ऐश्वर्या रायसोबत रोमान्स !या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय पूरन सिंह चौहान करतो आहे. सुशांत आणि आर माधवन यांच्याशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकीची या चित्रपटात झळकणार आहे. मात्र चित्रपटातील अभिनेत्रीच्या नावावर पडदा कायम आहे. यात अभिनेत्रीची  भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. पण ही भूमिका अतिशय लहान आहे. त्यामुळे कुठलीही हिरोईन या भूमिकेसाठी उत्सूक नसल्याची माहिती होती मात्र आता यासाठी श्रद्धा कपूरच्या नावाची चर्चा आहे. फातिमा सना शेख हिला चित्रपटाची  ऑफर देण्यात आली होती मात्र सध्या ती ठग्स ऑफ हिंदोस्तानच्या शूटिंगमध्ये व्सस्त आहे.