बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने सन २०१२ मध्ये आपल्या सिंगींग करिअरची सुरुवात केली. प्रियंकाने गायलेले ‘इन माई सिटी’ हे गाणे जगभर लोकप्रिय झाले आणि तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. आता प्रियंकाची चुलत बहीण परिणीती चोप्रा ही सुद्धा तिच्या पावलांवर पाऊल टाकत स्वत:चा ‘सिंगल म्युझिक व्हिडीओ’ लॉन्च करणार आहे.२०१७ मध्ये प्रदर्शित ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटातील ‘माना के हम यार नहीं’ हे गाणे परिणीतीने गायले होते. तिच्या आवाजातील हे गाणे लोकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. आता आणखी एक पाऊल टाकत परीने सिंगल म्युझिक व्हिडीओ लॉन्च करण्याची तयारी चालवली आहे. मेहंदी हसन यांचे ‘मुझे तुम नजर से...’ हे क्लासिक सॉन्ग परिणीतीच्या आवाजात एका नव्या रूपात श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे. पुढील महिन्यात परिणीती या म्युझिक व्हिडीओचे शूटींग सुरु करेल.
प्रियंकापाठोपाठ परिणीती चोप्रानेही कसली कंबर! लवकरच येणार पहिला ‘म्युझिक व्हिडीओ’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 11:46 IST
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने सन २०१२ मध्ये आपल्या सिंगींग करिअरची सुरुवात केली. आता परिणीती चोप्रा ही सुद्धा प्रियंकाच्या पावलांवर पाऊल टाकत स्वत:चा ‘सिंगल म्युझिक व्हिडीओ’ लॉन्च करणार आहे.
प्रियंकापाठोपाठ परिणीती चोप्रानेही कसली कंबर! लवकरच येणार पहिला ‘म्युझिक व्हिडीओ’!!
ठळक मुद्देतूर्तास बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे बायोपिक आणि ‘भूज- द प्राईड आॅफ इंडिया’ या चित्रपटांत परिणीती बिझी आहे.