आमिर खान सध्या गुलशन कुमारच्या बायोपिरमध्ये सध्या इंटरेस्ट दाखवतो आहे. सिनेमाचे नाव 'मोगुल' ठेवण्यात आले आहे. या सिनेमासाठी आधी अक्षय कुमारच्या नावाचा विचार करण्यात येत होता मात्र दिग्दर्शकासोबतचे त्याचे मतभेद झाल्यामुळे त्याने यातून एक्झिट घेतली. ‘मोगुल’साठी अक्षय कुमारच बेस्ट असल्याचे गुलशन कुमार यांची मुलगी तुलसी कुमार हिने म्हटले होते. अक्षय व गुलशन कुमार यांच्यात बऱ्याच अंशी साम्य आहे. अक्षय आणि आम्ही पंजाबी आहोत. तो दिल्लीचा आहे. माझे वडीलही दिल्लीचे होते, असे ती म्हणाली होती.
आता मोगुलशी संबंधीत आणखीन एक माहिती समोर आली आहे आमिर खान या सिनेमासाठी रणबीर कपूरला कास्ट करण्याचा विचर करतोय. आमिर खान प्रोडक्शन आणि टी-सिरीज मिळून मोगुलची निर्मिती करणार आहेत. भूषण कुमार यांने अक्षयने नकार दिल्यानंतर स्पष्ट केले होते की या सिनेमासाठी त्यांना तरुण चेहरा हवा आहे. भूषण कुमार म्हणाले, आम्ही अजूनपर्यंत या सिनेमासाठी कुणाला साईन केलेले नाही. मात्र आम्ही तरूण चेहऱ्याच्या शोधात आहोत. डीएनएच्या रिपोर्टनुसार गुलशन कुमार यांच्या बायोपिकसाठी आमिर खान आणि भूषण कुमार यांची पहिली पसंद रणबीर कपूर आहे.
मीडिया रिपोर्टनुसार भूषण कुमार यांना वाटते की रणबीर कपूर पेक्षा जास्त चांगली ही भूमिका कुणी साकारू शकत नाही तसेच सध्या रणबीरची मार्केट व्हॅल्यू चांगली आहे. संजूचा बायोपिक हिट झाल्यानंतर पुन्हा एकदा रणबीर कपूर फॉर्ममध्ये आला आहे.
गुलशन कुमार यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन सुभाष कपूर करणार आहेत. हा बिग बजेट चित्रपट असणार असल्याचे बोलले जाते. या सिनेमाची चित्रीकरणाला पुढच्या वर्षी सुरूवात होणार आहे.