Join us  

पुढचा नंबर वरूण धवनचा! गर्लफ्रेन्ड नताशा दलालसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 9:29 AM

होय, वरूण आणि नताशा लवकरच आपल्या नात्याची अधिकृत घोषणा करतील, अशी शक्यता आहे. वरूण दीर्घकाळापासून नताशा दलालसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

बी-टाऊनमध्ये सध्या नव्या-नव्या जोड्या बनताना दिसत आहेत. प्रियांका चोप्रा व निक जोनास यांचा साखरपुडा झाला. लवकरच हे कपल लग्नबंधनात अडकणार.  रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या कपलच्याही लग्नाची तारीख ठरलीय. येत्या २० नोव्हेंबरला हे कपल लग्नगाठ बांधणार आहे. या बॉलिवूड सेलिब्रिटीनंतर पुढचा नंबर वरूण धवन आणि नताशा दलाल यांचा असल्याचे कळतेय.होय, वरूण आणि नताशा लवकरच आपल्या नात्याची अधिकृत घोषणा करतील, अशी शक्यता आहे. वरूण दीर्घकाळापासून नताशा दलालसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. पण आता वरूण लवकरात लवकर या नात्याला नाव देऊ इच्छितो. खुद्द वरूणनेचं याचे संकेत दिले आहेत. लग्न केव्हा करणार, असा प्रश्न अलीकडे एका मुलाखतीत वरूणला विचारला गेला. यावर, ‘थोडा वेळ आहे, पण खूप नाही. होय, थोडी प्रतीक्षा करावीचं लागेल,’ असे त्याने म्हटले.

 

वरूण व नताशा हे दोघेही बालपणीचे मित्र आहेत. धवन कुटुंबासोबतचे तिचे फोटो सर्रास सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी वरूण व नताशा यांच्यात बे्रकअप झाल्याची खबर आली होती. याचे कारण आलिया भट्टसोबत वरूणची वाढती जवळीक सांगण्यात आले होते. पण नंतर वरूण व नताशा पुन्हा आधीसारखेचं एकमेकांसोबत फिरू लागलेत आणि त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या अफवा निघाल्या. काही दिवसांपूर्वी वरूण व नताशा दोघेही विदेशात सुट्टी एन्जॉय करताना दिसले होते. आता फक्त नताशा वरूणची ‘दुल्हनियां’ कधी बनणार, याचीच केवळ प्रतीक्षा असेल.

टॅग्स :वरूण धवन