Join us  

 अन् रिलीजनंतर बदलला प्रिया प्रकाश वारियरच्या डेब्यू चित्रपटाचा क्लायमॅक्स!  हे आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 11:50 AM

‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वारियरचा डेब्यू चित्रपट ‘ओरू अदार लव’ गत १४ फेबु्रवारीला प्रदर्शित झाला. पण आपल्या नटखट अदांमुळे रातोरात स्टार झालेल्या प्रियाचा अभिनयही फार कमाल दाखवू शकला नाही.

ठळक मुद्देमेल लीड रोशन अब्दुल रऊफचा मृत्यू आणि फिमेल लीड नूरिन शीरिफ हिच्या रेप सीनने ‘ओरू अदार लव’चा शेवट करण्यात आला होता. असा शॉकिंग क्लायमॅक्स पाहून प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वारियरचा डेब्यू चित्रपट ‘ओरू अदार लव’ गत १४ फेबु्रवारीला प्रदर्शित झाला. पण आपल्या नटखट अदांमुळे रातोरात स्टार झालेल्या प्रियाचा अभिनयही फार कमाल दाखवू शकला नाही. प्रदर्शनापूर्वी जवळ जवळ वर्षभर या चित्रपटाची चर्चा रंगली. पण चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांची निराशा झाली. प्रियाचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या कसोटीवर खरा उतरला नाही. विशेषत: चित्रपटाच्या क्लायमॅक्सवर प्रचंड टीका झाली. सोशल मीडियावर लोकांनी अनेक निगेटीव्ह कमेंट्स लिहिलेत. कदाचित या निगेटीव्ह कमेंट्सनी मेकर्सचे डोळे उघडले आणि त्यांनी थेट चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलण्याचाच निर्णय घेतला.

होय,चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर  ‘ओरू अदार लव’चा क्लायमॅक्स बदलण्यात आलाय. या नव्या क्लायमॅक्सचे शूटही पूर्ण झालेय. दिग्दर्शक ओमर लूलू यांनी स्वत: ही माहिती दिली. प्रेक्षकांच्या मागणीनुसार, मला चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलावा लागला. आता प्रेक्षकांना एक नवा क्लायमॅक्स पाहायला मिळेल. १० मिनिटांचा हा नवा सीक्वेंस चित्रपटात टाकल्यानंतर उद्या बुधवारपासून ‘ओरू अदार लव’ नव्याने प्रदर्शित होईल, असे त्यांनी सांगितले. ‘ओरू अदार लव’ हा माझा तिसरा चित्रपट आहे. एकापाठोपाठ एक रोमॅन्टिक कॉमेडी दिल्यानंतर या चित्रपटात मला काही वेगळे करायचे होते. मला एक वास्तववादी चित्रपट बनवायचा होता. त्यामुळे मी काहीसा शॉकिंग क्लायमॅक्स निवडला होता. पण लोकांकडून त्याला इतकी शॉकिंग प्रतिक्रिया मिळतील, याची मला कल्पना नव्हती. लोकांची नाराजी बघून मी आणि निर्मात्यांनी नवा क्लायमॅक्स शूट करण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी सांगितले.

 मेल लीड रोशन अब्दुल रऊफचा मृत्यू आणि फिमेल लीड नूरिन शीरिफ हिच्या रेप सीनने ‘ओरू अदार लव’चा शेवट करण्यात आला होता. असा शॉकिंग क्लायमॅक्स पाहून प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या क्लायमॅक्समुळे चित्रपट १५ मिनिटांनी लांबला होता. ‘ओरू अदार लव’ हा शालेय प्रेमावर आधारित चित्रपट आहे. प्रिया प्रकाश ही या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. प्रियाची या चित्रपटातील एक क्लीप प्रचंड गाजली होती. या क्लिपने प्रियाला एका रात्रीत स्टार बनवले होते.

टॅग्स :प्रिया वारियर