बॉलिवूडमध्ये फ्लॉप झाल्यानंतर आर्मी कॅप्टनशी लग्न करून करोडो रूपयांच्या कंपनीची मालकीण बनली ‘ही’ अभिनेत्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST
बॉलिवूडमध्ये बºयाचशा अशा अभिनेत्री आहेत, ज्यांचे पदार्पण धमाकेदार राहिले आहे. परंतु नंतरच्या चित्रपटांनी मात्र घोर निराशा केली आहे. अशाच अभिनेत्रींपैकी एक नाव ट्यूलिप जोशी हिचे आहे. होय, ट्यूलिपने ‘मेरे यार की शादी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. तिचा हा चित्रपट हिटदेखील ठरला, परंतु नंतरच्या चित्रपटांनी जणू काही फ्लॉपचा सिलसिला सुरूच ठेवला. ट्यूलिपच्या करिअरचा आढावा घेणारा हा फोटो वृत्तांत...
बॉलिवूडमध्ये फ्लॉप झाल्यानंतर आर्मी कॅप्टनशी लग्न करून करोडो रूपयांच्या कंपनीची मालकीण बनली ‘ही’ अभिनेत्री!
बॉलिवूडमध्ये बºयाचशा अशा अभिनेत्री आहेत, ज्यांचे पदार्पण धमाकेदार राहिले आहे. परंतु नंतरच्या चित्रपटांनी मात्र घोर निराशा केली आहे. अशाच अभिनेत्रींपैकी एक नाव ट्यूलिप जोशी हिचे आहे. होय, ट्यूलिपने ‘मेरे यार की शादी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. तिचा हा चित्रपट हिटदेखील ठरला, परंतु नंतरच्या चित्रपटांनी जणू काही फ्लॉपचा सिलसिला सुरूच ठेवला. ट्यूलिपच्या करिअरचा आढावा घेणारा हा फोटो वृत्तांत...११ सप्टेंबरला ट्यूलिपने तिचा ३८वा वाढदिवस सेलिब्रेट केला. तिचा जन्म १९७९ मध्ये गुजराती परिवारात झाला. ट्यूलिप जोशीने बॉलिवूडमध्ये ‘मेरे यार की शादी हैं’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर ‘मातृभूमी, दिल मांगे मोर, धोखा, मिशन ९० डेज, कभी कहीं, सुपरस्टार, डॅडी कूल आणि रनवे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र हे सर्व चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखवू शकले नाहीत. बॉलिवूडमध्ये फ्लॉपचा लागोपाठ सामना करावा लागत असल्याने ट्यूलिपने तामिळ, कन्नाळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले. ट्यूलिपच्या लव्ह लाइफविषयी सांगायचे झाल्यास तिचे आर्मी कॅप्टन विनोद नायर याच्याशी अफेअर होते. दोघांनी तब्बल चार वर्षे एकमेकांना डेट केले. दोघेही बºयाच काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. त्यानंतर दोघे विवाहाच्या बंधनात अडकले. ट्यूलिपचे पती विनोद यांनी ‘प्राइड आॅफ लॉयन्स’ ही प्रसिद्ध कांदबरी लिहिली आहे. ते १९८९ ते १९९५ दरम्यान भारतीय सैन्यदलात होते. ते बºयाचशा हाय रिस्क मिशनमध्ये सहभागी झाले आहेत. रिपोर्टस्नुसार विनोद यांनी सप्टेंबर २००७ मध्ये ट्रेनिंग आणि मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्मची सुरुवात केली. सध्या ट्यूलिप विनोद यांची सहाशे कोटी रूपयांची कंपनी सांभाळत आहे. ती या कंपनीच्या संचालक पदावर आहे. सध्या ती तिच्या पतीसोबत आनंदी असून, बिझनेसमध्ये ती व्यस्त आहे.