Join us  

आपल्यांना गमवून काही दिवसानंतरच 'हे' सेलेब्स पुन्हा परतले कामावर !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 8:07 AM

-रवींद्र मोरे १९७० मधील 'मेरा नाम जोकर' चित्रपटात लिड अ‍ॅक्टर राजकपूर होते. चित्रपटात जोकर बनलेल्या राजकपूर यांची आईचे निधन ...

-रवींद्र मोरे १९७० मधील 'मेरा नाम जोकर' चित्रपटात लिड अ‍ॅक्टर राजकपूर होते. चित्रपटात जोकर बनलेल्या राजकपूर यांची आईचे निधन होते आणि त्यानंतरही ते  'द शो मस्ट गो आॅन' म्हणत आपले काम सुरु ठेवतात आणि दर्शकांना हसवतात. प्रत्येक्षात बॉलिवूडमध्ये असे काही अ‍ॅक्टर्स आहेत ज्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आपल्या घरातील सदस्याचे निधन झाले आहे, मात्र 'द शो मस्ट गो आॅन' म्हणत मोठ्या हिमतीने शूटिंग पूर्ववत सुरु केली आहे. जाणून घेऊया त्या सेलेब्सबाबत... * जान्हवी कपूरअलिकडेच बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन झाले. मात्र त्या गेल्यानंतरही काही दिवसानंतर दु:ख विसरुन जान्हवी कपूर आपल्या कामावर परत आली. ती सध्या सैराट रिमेक 'धाकड' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जान्हवीला आपल्या आईचे स्वप्न पूर्ण क रायचे आहे. त्यामुळे झालेले दु:ख विसरुन ती अवघ्या काही दिवसानंतर लगेच कामावर परतली.  * प्रियांका चोप्राप्रियांका चोप्रानेही एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आपल्या वडिलांना गमविले आहे, मात्र तिनेही दु:ख विसरुन आपल्या कर्तव्यास महत्त्व देत शूटिंग पूर्ववतसुरु केली होती. 'मेरी कॉम' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्या वडिलांचे निधन झाले होते. मात्र काही दिवसानंतरच ती आपल्या कामावर परत आली होती.  * अक्षय खन्नागेल्या वर्षी विनोद खन्नाच्या निधनाने खन्ना परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. अक्षय खन्ना त्यावेळी 'मॉम' चित्रपटाची शूटिंग करत होता. त्याला जेव्हा ही घटना कळली तेव्हा तेव्हा तो सेटवरच होता आणि तो लागलीच घरी गेला होता. मात्र काही दिवसाच्या कालावधीनंतर विनोद खन्नाने सर्व दु:ख विसरुन चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली. * अर्जुन कपूर 'इश्क्जादे' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अर्जुन कपूरच्या आईचे निधन झाले होते. अर्जुनसाठी हे दु:ख खूपच मोठे होते. मात्र चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अडथळा येऊ दिला नाही आणि काही दिवसानंतरच अर्जुन पुन्हा शूटिंगसाठी वापस आला होता.   * जूही चावला जूही चावलानेही 'डुप्लीकेट' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आपल्या आईला गमविले होते. या घटनेने तिच्यावर खूप मोठा दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र यावेळी तिला शाहरुख खानने मदत केली आणि दु:खातून बाहेर काढले होते.