Join us  

‘ड्रीम गर्ल’ हिट झाला अन् आयुष्यमान खुराणा ‘प्रॉफिट शेअरिंग’ स्टार झाला!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 3:50 PM

बरेली की बर्फी, शुभमंगल सावधान, अंधाधुन, बधाई हो, आर्टिकल 15 पाठोपाठ ‘ड्रीम गर्ल’ हा आयुष्यमान खुराणाचा सहावा चित्रपटही हिट झाला आहे. साहजिकच आयुष्यमानची डिमांड वाढली आहे. अशात त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देचित्रपटाच्या नफ्यातील वाटा घेणारा आयुष्यमान खुराणा पहिला स्टार नाही. आमिर खान, अक्षय कुमार, सलमान खान असे अनेक दिग्गज स्टार्स मानधनाऐवजी नफ्यातील काही टक्के वाटा घेतात.

आयुष्यमान खुराणाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. समीक्षकांसह प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला हा सिनेमा लवकरच 100 कोटी क्लबमध्ये सामील होईल, असा अंदाज आहे.  विशेष म्हणजे, आयुष्यमानचा हा सलग सहावा हिट चित्रपट आहे. बरेली की बर्फी, शुभमंगल सावधान, अंधाधुन, बधाई हो, आर्टिकल 15 पाठोपाठ ‘ड्रीम गर्ल’ हा त्याचा सहावा चित्रपटही हिट झाला आहे. साहजिकच आयुष्यमानची डिमांड वाढली आहे. अशात त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. होय, आयुष्यमान हा देखील अन्य काही स्टार्सप्रमाणे  प्रॉॅफिट शेअरिंग स्टार्सच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. म्हणजेच आता  मानधनाऐवजी चित्रपटाच्या नफ्यातील काही टक्के वाटा तो घेणार आहे.

 एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत स्वत: आयुष्यमानने हा खुलासा केला. ‘अंधाधुन या सिनेमापासून मी प्रॉफिट शेअरिंगला सुरुवात केली. अर्थात याबद्दल कुणालाही माहिती नव्हती. पण आता हे जगजाहिर झाले आहे, ’असे  त्याने सांगितले.

 चित्रपटाच्या नफ्यातील वाटा घेणारा आयुष्यमान खुराणा पहिला स्टार नाही. आमिर खान, अक्षय कुमार, सलमान खान असे अनेक दिग्गज स्टार्स मानधनाऐवजी नफ्यातील काही टक्के वाटा घेतात. आमिर खान  चित्रपटाच्या नफ्यातील 80 टक्के वाटा घेतो. तर सलमान खान ५० टक्के आकारतो.  अक्षय कुमार ६० टक्के वाटा घेतो.  शाहरुख आणि अजय देवगण हे अनेकदा सहनिर्माते बनण्याच्या अटीवर चित्रपट स्वीकारतात.  हृतिक रोशन  ४० कोटींच्या आसपास  मानधन घेतो किंवा ४८ टक्के प्रॉफिट शेअर स्वीकारतो. आत्ता अभिनेत्यांपाठोपाठ काही अभिनेत्रीदेखील नफ्यातील वाटा घेऊ लागल्या आहेत. 

टॅग्स :आयुषमान खुराणा