Join us  

विंदू दारा सिंगसोबत घटस्फोट झाल्यानंतर फराह नाझने केले या अभिनेत्यासोबत लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 4:16 PM

फराह ही नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने गोविंदासोबत तर अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते.

ठळक मुद्देफराहचा घटस्फोट झाल्यानंतर काहीच वर्षांत तिची ओळख सुमीत सेहगल या अभिनेत्यासोबत झाली. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले.

दारा सिंग यांचा मुलगा विंदू दारा सिंगने काही वर्षांपूर्वी चित्रपटांमध्ये काम केले होते. पण त्याला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही. तो त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या आयुष्यातील वादांमुळे जास्त चर्चेत राहिला. विंदूचे पहिले लग्न अभिनेत्री फराह नाझ सोबत झाले होते. पण काहीच वर्षांत त्यांनी घटस्फोट घेतला.

फराह ही नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने गोविंदासोबत तर अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ती अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण आहे. फराह गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. विंदू दारा सिंग आणि फराह यांची ओळख नव्वदीच्या दशकात एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. विंदू आणि फराह काहीच महिन्यात एकमेकांच्या प्रेमात पडले. पण त्यांच्या दोघांच्याही घरातील मंडळी या नात्याच्या विरोधात होते. फराहने एखाद्या सेटल व्यक्तीशी लग्न करावे असे तिच्या घरातील लोकांना वाटत होते तर घर सांभाळणाऱ्या मुलीसोबत विंदूने लग्न करावे अशी दारा सिंग यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी ब्रेकअप केले. 

त्याचदरम्यान विंदू त्याच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तामीळनाडूला गेला होता. त्यामुळे त्या दोघांचा एकमेकांशी काहीही संपर्क नव्हता. पण या दुराव्यामुळेच आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे त्या दोघांना जाणवले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबियांनी देखील लग्नासाठी परवानगी दिली. त्यांना लग्नानंतर एकच वर्षांत मुलगा झाला. सगळे काही सुरळीत सुरू असताना त्यांच्यात वाद व्हायला लागले आणि 2002 मध्ये फराह मुलाला घेऊन दुसरीकडे राहायला लागली आणि त्यांनी घटस्फोट घेतला. 

फराहचा घटस्फोट झाल्यानंतर काहीच वर्षांत तिची ओळख सुमीत सेहगल या अभिनेत्यासोबत झाली. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. विंदू आणि फराहच्या पहिल्या मुलाला देखील सुमीतने स्वीकारले. फराह आणि सुमीत त्यांच्या संसारात खूश असून सुमीतचे देखील हे दुसरे लग्न आहे. त्याचे पहिले लग्न सायरा बानू यांची भाची अभिनेत्री शाहीन बानूसोबत झाले होते. सुमीतने स्वर्ग जैसा घर, शानदार, साजन की बाहो में, सौदा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.  

टॅग्स :तब्बू