Join us  

हरलीन सेठीसोबत ब्रेकअप झाल्यावर विकी कौशल बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीसोबत आहे नात्यात! जाणून घ्या कोण आहे ती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 6:27 PM

आता विकी बॉलिवूडच्या ‘बियाँड द क्लाऊडस’ फेम अभिनेत्री मालविका मोहनन हिच्यासोबत नात्यांत असल्याचं समजतंय.

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आता विकी  कौशल हा अभिनेता बॉलिवूडच्या दिग्गज निर्मात्यांच्या फेव्हरेट कलाकारांच्या लिस्टमध्ये आहे. मध्यंतरी सुत्रांकडून कळाले की, त्याने हरलीन सेठीसोबत ब्रेकअप केले आहे. ते दोघे बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे अनेकांना या बातमीमुळे चांगलाच धक्का बसला. आता विकी बॉलिवूडच्या ‘बियाँड द क्लाऊडस’ फेम अभिनेत्री मालविका मोहनन हिच्यासोबत नात्यांत असल्याचं समजतंय.

हरलीनसोबत ब्रेकअप झाल्यावर विकी  कौशलचे नाव कॅटरिना कैफ, भूमी पेडणेकर, हुमा कुरेशी यांच्यासोबत जोडले गेले होते. तेव्हा त्यांच्याबद्दलची एखादी बातमी आली नाही. आता मात्र सुत्रांकडून कळतेय की, त्याचे नाव मालविकासोबत जोडले जात आहे. विकी, सनी आणि मालविका हे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. एकमेकांसोबत ते एन्जॉय देखील करतात. खरंतर विकी आणि मालविका एकमेकांच्या खूप जवळचे आहेत. विकी त्याच्या कामात केवढाही बिझी असला तरीही तो तिच्या घरी डिनर किंवा लंचसाठी जातोच. आता असे वाटते की, दोघांचेही नाते खूपच गंभीर होत आहे.                विकी कौशल आणि मालविका एकमेकांना काही स्पेशल क्षणांवेळी गिफ्टस, सरप्राईज देत असतात. कधी विकी मालविकाच्या घरी पोहोचतो तर कधी तिच्या शूटिंगच्या सेटवर जाऊन पोहोचतो. मालविका ही विकीच्या अशा वागण्यामुळे खूप खूश आहे. आता एवढंच बघायचं की, विकी हे नाते किती पुढे पर्यंत नेऊ इच्छितो?

टॅग्स :विकी कौशलहरलीन सेठी