Join us  

३० वर्षांनी माधुरीने 'हम आपके हौ कौन'मधील लूक केला रिक्रिएट, लोकं म्हणाले.. प्रेम कुठे आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 3:59 PM

माधुरी दीक्षित ३० वर्षांनी 'हम आपके है कौन'मधील निशाच्या लूकमध्ये समोर आली (Madhuri Dixit)

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री. माधुरीच्या सौंदर्यांची भुरळ आजही सर्वांना आहे. माधुरीचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या हृदयात घर करुन आहेत. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे 'हम आपके है कौन'. (Hum Aapke Hai Kaun) 'हम आपके है कौन'मध्ये माधुरी आणि सलमानची (Salman Khan) जोडी चांगलीच गाजली. आता ३० वर्षांनी माधुरी दीक्षितने 'हम आपके है कौन' मधील तिचा गाजलेला लूक पुन्हा क्रिएट केलाय. 

माधुरी आज 'डान्स दिवाने'च्या सेटवर स्पॉट झाली. माधुरीने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. अशीच हुबेहुब साडी तिने 'हम आपके है कौन' मधील 'दीदी तेरा तेवर दिवाना' या गाजलेल्या गाण्यात नेसली होती. 'डान्स दिवाने'च्या मंचावर बॉलिवूडमधील गाजलेल्या व्यक्तिरेखांना रिक्रिएट केलं गेलं. माधुरीशिवाय कॉमेडियन भारती सिंग 'जब वी मेट' मधील करीनाच्या लूकमध्ये दिसली. 

'डान्स दिवाने'च्या सेटवर माधुरीला परतून खुप आनंद झालेला दिसतोय. माधुरीने केलेला लूक पाहून अनेकांना 'हम आपके है कोन'ची निशा आठवली. याशिवाय 'प्रेम कुठे आहे?' अशाही कमेंट लोकं करत आहेत. अनेकांना माधुरी - सलमानची आठवण आली. माधुरीने हा लूक केल्याने ती 'डान्स दिवाने'च्या सेटवर पुन्हा एकदा 'दीदी तेरा देवर दिवाना' गाण्यावर डान्स करताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको. 

टॅग्स :माधुरी दिक्षितहम आपके हैं कौनसलमान खान