Join us  

​२३ वर्षांनंतर परततेयं टीव्हीवरची पहिली ‘सीता’ ! ‘या’ चित्रपटातून करतेयं कमबॅक !!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2017 4:57 AM

सन १९८६ मध्ये आलेल्या रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेने एक इतिहास घडवला होता. या मालिकेइतकी लोकप्रीयता छोट्या पडद्यावरच्या ...

सन १९८६ मध्ये आलेल्या रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेने एक इतिहास घडवला होता. या मालिकेइतकी लोकप्रीयता छोट्या पडद्यावरच्या कुठल्याच टीव्ही शोच्या वाट्याला आली नाही. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेचे नाव घेतल्यानंतर आजही श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि रावण यांचे चेहरे डोळ्यासमोर येतात. या मालिकेत अभिनेता अरुण गोविल यांनी भगवान श्रीरामाची भूमिका साकारुन भरपूर लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली होती. तर दिवंगत अभिनेते दारा सिंग यांनी हनुमान बनून आपली एक वेगळी प्रतिमा तयार केली होती. अरविंद त्रिवेदी यांनी साकारलेला रावण आजही लोक विसरु शकलेले नाहीत. या मालिकेत सीतेची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया हिने सुद्धा अपार लोकप्रीयता मिळवली होती. हीच दीपिका आता इतक्या वर्षांनंतर परत येतेय. होय, टीव्हीवर नाही तर चित्रपटातून ती कमबॅक करणार आहे.‘गालिब’ या चित्रपटात दीपिका एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अफजल गुरूचा मुलगा गालिब गुरु याच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. यात दीपिका गालिबच्या आईची भूमिका साकारताना दिसेल. ‘रामायण’नंतर दीपिका ‘स्वार्ड आॅफ टीपू सुल्तान’ आणि ‘विक्रम और वेताल’सारख्या लोकप्रीय शोमध्ये दिसली होती. यानंतर उद्योगपती हेमंत टोपीवालासोबत लग्न केल्यानंतर दीपिकाने इंडस्ट्रीला रामराम ठोकला. दीपिकाच्या पतीची कॉस्मेटिक कंपनी आहे. लग्नानंतर दीपिका पतीच्या कंपनीत काम करू लागली. तिला निधी आणि जुही नावाच्या दोन मुली आहेत.ALSO READ: ‘या’ टीव्ही अभिनेत्याचे दर्शन घेण्यासाठी लोक चक्क सेटवर जायचे; आज मिळेना काम!अलीकडे दीपिका ‘छुटा छेडा सीजन2’हा गुजराती शो होस्ट करताना दिसली होती. रिअल लाईफ कपलच्या आयुष्यात आलेल्या अडचणी दूर करण्यास हा शो मदत करायचा. दीपिकाने राजकारणातही आपला हात आजमावला आहे. १९९९ मध्ये ती भाजपच्या तिकीटावर लोकसभेत पोहोचली होती आणि बडोद्याचे खासदारपदही भुषविले होते. दीपिकाने राज किरण सोबत ‘सुन मेरी लैला’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते.  राजेश खन्नासोबतही तिने तीन चित्रपटही केले आहेत. १९९४ मध्ये दीपिका ‘खुदाई’ या   हिंदी चित्रपटात शेवटची दिसली होती.अनेक गुजराती, बंगली, तामिळ सिनेमेही तिने केले आहेत.