Join us  

१६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हेरा फेरी ३ येणार, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पडला मीम्सचा पाऊस!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 3:51 PM

Herapheri3 movie : हेरा फेरी या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. 'हेरा फेरी ३'ची निर्मात्यांनी घोषणा करताच नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस पाडला आहे.

हेरा फेरी या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातील सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या तिकडीने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. या चित्रपटातील तिघांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. य चित्रपटातील अनेक संवाद तर आजही प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहेत. या चित्रपटाच्या यशानंतर याच तिकीडीला घेऊन निर्मात्यांनी फिर हेरा फेरी हा हेरी फेरीचा दुसरा भाग बनवला होता. हा चित्रपटदेखील प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. हेरी फेरी या चित्रपटानंतर हेरा फेरी ३ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून होती. फायनली हा सिनेमा बनत असल्याचे निर्माते फिरोज नाडियाडवाल्यांनी सांगितलं आहे.

'हेरा फेरी ३' जर हीट गेला तर 'हेरा फेरी ४' आणि 'हेरा फेरी ५' बनवणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. 'हेरा फेरी-3' बनवण्याची घोषणा झाल्यापासून ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ट्विटरवर मीम्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून लोकही यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. 

 

 

 

 

 

टॅग्स :परेश रावलसुनील शेट्टीअक्षय कुमार