कंगनासोबत अफेअर? रणबीरने केला खुलासा..
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 16:29 IST
कंगना रानोट व रणबीर कपूर यांच्यात काहीतरी शिजत आहे. दोघांमध्ये अफेअर सुरु आहे, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून कानावर ...
कंगनासोबत अफेअर? रणबीरने केला खुलासा..
कंगना रानोट व रणबीर कपूर यांच्यात काहीतरी शिजत आहे. दोघांमध्ये अफेअर सुरु आहे, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून कानावर पडत आहेत. हृतिक रोशनसोबत सुरु असलेल्या वादात रणबीरने कंगनाची बरीच मदत कली होती. त्यामुळे कंगना व रणबीरबद्दलच्या बातम्यांना जरा जास्तच ऊत आला होता. पण रणबीर म्हणे, या बातम्यांमुळे अपसेट आहे. या संपूर्ण प्रकरणावर रणबीरने खुलासा केला आहे. रणबीरने म्हणे,एक चांगली मैत्रिण या नात्याने कंगनाला मदत केली. मात्र लोकांनी त्याचा वेगळाच अर्थ काढला. कंगनानेही यावर चुप्पी साधल्याने या नात्यातील सस्पेन्स चांगलाच वाढला. रणबीर ‘जग्गा जासूस’ची शूटींग संपवून भारतात परतल्यावर त्याच्या कानावर या बातम्या गेल्या. साहजिकच तो या सगळ्या चर्चेमुळे जाम वैतागला. रणबीरच्या एका निकटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगना व तो डेट करीत असल्याची बातमी कशी पसरली, हेच रणबीरला कळत नाहीत. यात काहीही तथ्य नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. अशा बातम्या पेरणारा कोण, हेही रणबीरला ठाऊक आहे. या अफवा पसरविणे थांबले नाहीच, तर याविरूद्ध ठोस पाऊल उचलण्याचा निर्णय रणबीरने इरादा आहे. आता पुढे काय होते, ते बघूच!!