Join us  

OMG! पुन्हा वाढले अदनान सामीचे वजन, पाहा latest photo!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 11:22 AM

कालपरवा अदनान पत्नी रोया फरयाबी व मुलगी मेदिनासोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी त्याचे वजन बरेच वाढलेले दिसले.

ठळक मुद्देअदनान सामी हा मुळचा पाकिस्तानचा आहे. कभी तो नजर मिलाओ, थोडी सी लिफ्ट करा दे अशा अनेक गाण्यांमुळे त्याला भारतात नवी ओळख मिळाली.

2006 साली अदनान सामीचे वजन 230 किलो होता. वजन असेच वाढत राहिले तर सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ जिवंत राहणार नाही, हे डॉक्टरांनी त्याला बजावले होते. मग काय, अदनानने मनावर घेतले आणि केवळ 11 महिन्यांत 165 किलो वजन कमी केले. विशेष म्हणजे, कुठलीही सर्जरी न करता. केवळ संतुलित आहार, व्यायाम आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने अशक्य ते शक्य करून दाखविले. 

कधीकाळी 230 किलो वजनाचा अदनान एकदम स्लिम आणि फिट होऊन स्टेजवर परतला तेव्हा अनेकांना विश्वास बसेना. पण आता कदाचित अदनान पुन्हा एकदा गोलमटोल होताना दिसतोय.

होय, कालपरवा अदनान पत्नी रोया फरयाबी व मुलगी मेदिनासोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी त्याचे वजन बरेच वाढलेले दिसले.

अदनान सामी हा मुळचा पाकिस्तानचा आहे. कभी तो नजर मिलाओ, थोडी सी लिफ्ट करा दे अशा अनेक गाण्यांमुळे त्याला भारतात नवी ओळख मिळाली. यानंतर अदनानने भारताचे नागरिकत्व स्वीकारले. 2015 मध्ये भारत सरकारने त्याना भारतीय नागरिकत्व बहाल केले. बजरंगी भाईजान, खोसला का घोंसला, धमाल लाईफ इन अ मेट्रो, अशा अनेक चित्रपटांतही त्याने गाणी गायलीत. 

अफगान मूळची जर्मनीत राहणारी रोया ही अदनानची तिसरी बायको आहे. त्यांचे लग्न 29 जून, 2010 मध्ये झाले होते. 1996 मध्ये अदनानने अभिनेत्री जेबा बख्तियारसोबत लग्न केले होते. या दोघांना एक मुलगा अजान सामी खान आहे. तीन वर्षांनंतर अदनान व जेबाचा घटस्फोट झाला होता. यापश्चात अदनानने दुबईस्थित सबाह गलादरीसोबत लग्न केले होते. पण 2004 मध्ये दोघांना घटस्फोट झाला. 2007 मध्ये अदनान व सबाहने दुसºयांना लग्न केले. पण 2009 मध्ये त्यांचा पुन्हा घटस्फोट झाला.

टॅग्स :अदनान सामी