Join us  

कौतुकास्पद! आर. माधवनची पत्नी कोरोना काळात गरीब मुलांचे घेतेय ऑनलाइन क्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 10:05 AM

अभिनेता आर. माधवनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची लोकांमध्ये खूप चर्चा होताना दिसते आहे.

बॉलिवूड अभिनेता आर. माधवन भलेही चित्रपटात कमी दिसत असला तरी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची लोकांमध्ये खूप चर्चा होताना दिसते आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओत त्याची पत्नी सरीता बिरजे गरीब मुलांना शिकवताना दिसते आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिचे खूप कौतुक करत आहेत. 

आर माधवननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आर माधवनची पत्नी सरिता बिरजे गरीब मुलांना ऑनलाइन शिकवताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना आर माधवनने लिहिले, 'जेव्हा पत्नी तुम्ही खूपच लहान असल्याची जाणीव करून देते.' या व्हिडिओत आर. माधवन म्हणतोय, 'जेव्हा तुमची पत्नी देशातील गरीब मुलांना ऑनलाइन शिकवत असते आणि तुम्ही काहीच करत नसता.' हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

दरम्यान, आर. माधवनला २५ मार्चला कोरोनाची लागण झाली होती. त्याने त्यावेळी म्हटले होते की, फरहानच्या रँचोला फॉलो करायचे होते आणि व्हायरस नेहमीच त्यांना फॉलो करत होता. यावेळी त्यांना पकडलेच मात्र ऑल इज वेल आणि कोव्हिड लवकरच विहिरीत पडणार. मी बरा होतोय.

आर. माधवनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या एरोस्पेस अभियंता नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १ एप्रिलला रिलीज केला होता. या चित्रपटात अभिनेता आर. माधवन नंबी यांची भूमिका साकारतो आहे. 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' हिंदी, तेलुगू, मलयालम, तमिल, अंग्रेजी आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :आर.माधवनकोरोना वायरस बातम्या