Join us  

मॉडेलसोबत लग्न करणार आदित्य रॉय कपूर ? अभिनेत्याने दिली अशी रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 5:48 PM

बॉलिवूडमधील कलाकार रिलेशनशिपला घेऊन नेहमीच चर्चेत असते.

बॉलिवूडमधील कलाकार रिलेशनशिपला घेऊन नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून आदित्य रॉय कपूर आणि मॉडल दीवा धवनला घेऊन चर्चेत आहे. दोघांनी अजूनपर्यंत या गोष्टीला दुजोरा दिला नाही. दोघे एका हॉटेल बाहेर एकत्र स्पॉट झाले. आदित्यने मीडियाला सांगितले होते की, दोघे एकत्र जिममध्ये वर्कआऊट करतात.   

आदित्य सध्या आपला आगामी सिनेमा मलंगच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान आदित्यला त्याच्या रिलेशनशिप स्टेटसला घेऊन प्रश्न विचारण्यात आले होते.  यावर तो हसत हसत म्हणाला, या गोष्टीला सीक्रेटच राहू द्या की मी सिंगल आहे की नाही. अफेअर्सच्या चर्चांना आम्ही दोघांनी नकार दिला आहे. मीडियामध्ये माझ्या लग्नाच्या चर्चा ऐकल्यानंतर माझ्या आईने मला विचारले होते की, असे काही आहे का जे मला जाणून घेण्याची आवश्यकता आहे. यावर माझ्यात आणि दिवामध्ये फक्त मैत्रिचे नातं असल्याचे मी त्यांना सांगितले होते.          मलंग चित्रपटातील आदित्य रॉय कपूर व दिशा पटानी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते आहे. या चित्रपटाच्या पोस्टरपासून ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मलंग हा एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट असून यात अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्यासोबत आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानी प्रमुख भूमिकेत आहेत.

मलंग' ७ फेब्रुवारीला रिलीज़ होणार आहे, ज्याचे दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केले आहे. टी-सीरीज़चे भूषण कुमार, कृष्ण कुमार, लव फिल्म्सचे लव रंजन, अंकुर गर्ग आणि नॉर्दर्न लाइट्स एंटरटेनमेंटचे जे शेवक्रमणी यांची निर्मिती आहे.

टॅग्स :आदित्य रॉय कपूर