Join us

आदित्य नारायणाच्या अडचणीत वाढ, अपघातात जखमी झालेल्या ड्रायव्हरची परिस्थिती अजूनही गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 13:09 IST

बॉलिवूडचा सिंगर आणि टीव्ही शो होस्ट आदित्य नारायण 12 मार्च 2018 ला आपल्या कारने एक ऑटोरिक्षाला टक्कर दिली होती. ...

बॉलिवूडचा सिंगर आणि टीव्ही शो होस्ट आदित्य नारायण 12 मार्च 2018 ला आपल्या कारने एक ऑटोरिक्षाला टक्कर दिली होती. या अपघातात रिक्षात चालक आणि पॅसेंजर जखमी झाले होते. अपघातात जखमी झालेला रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. आदित्यने रिक्षा चालकाच्या उपचारांचा संपूर्ण खर्च उचलला आहे. या अपघाताला आता दोन आठवडे झाले आहे. मात्र रिक्षा चालकाची प्रकृती अजूनही नाजूकच आहे. ऐवढ्या दिवसानंतरही त्याच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा झाली नाही आहे. तर त्याची प्रकृती दिवसांदिवस नाजूक होत चालली आहे. त्यांने अद्यापही कुटुंबीतील एक ही सदस्याला ओळखले नाही आहे.  मिळालेल्या माहितीनुसार आदित्य नारायण आणि उदित नारायण अनेक वेळा रुग्णालयात चालकाच्या कुटुंबीयांची  भेट घेण्यासाठी गेले आहेत. ऐवढेच नाही तर आदित्याच्या आईने सुद्धा रिक्षा चालकाच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. स्पॉटब्वॉयच्या रिपोर्टनुसार या चालकाचे वय 64 वर्ष आहे. त्याला दोन मुलं आहेत. घराची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. मिल बंद झाल्यानंतर त्याच्या ड्रायव्हरची नोकरी गेली. त्यानंतर त्याने बँकेकडून कर्ज काढून कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा खरेदी केली. रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर असल्यामुळे आदित्यच्या अडचणीत वाढ झाली आहे.आदित्य या आधी  रायपूर एअरपोर्टवर एका एअरलाईन्स अधिकाऱ्यासोबत हुज्जत घातल्यामुळे चर्चेत आला होता. मात्र त्यानंतर आदित्यने त्या कर्मचाऱ्याची माफी मागितली होती. आदित्यने बाल कलाकार म्हणून त्याच्या करिअरची सुरुवात केली. 'रंगीला', 'परदेश' आणि 'जब प्यार किसीसे होता है' सारख्या चित्रपटांमध्ये केले होते.  2010 मध्ये आलेल्या शापित चित्रपटात त्याने मुख्य भूमिका केली होती. सारेगमपा लिटिल चॅम्पस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गेली अनेक वर्ष आदित्य करतो आहे.  छोट्या पडद्यावर आदित्याचा चेहरा ओळखीचा आहे. मात्र त्याला हवे तसे यश अजून बॉलिवूडमध्ये मिळवता आले नाही.